तुम्हाला माहितीये का? Jeetendra यांनी पहिल्या चित्रपटात केली महिलेची भूमिका

Jeetendra Birthday Special : जीतेंद्र यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत. त्यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास कसा सुरु झाला आणि त्यांनी पहिल्या चित्रपटात महिलेची भूमिका साकारली होती. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 7, 2023, 03:39 PM IST
तुम्हाला माहितीये का? Jeetendra यांनी पहिल्या चित्रपटात केली महिलेची भूमिका title=
(Photo Credit : File Photo)

Jeetendra Birthday : बॉलिवूड अभिनेता जीतेंद्र (Jeetendra) यांचा आज 81 वा वाढदिवस आहे. जीतेंद्र यांचा जन्म हा अमृतसरच्या आर्टिफिशियल ज्वेलरी सप्लायर अमरनाथ यांच्या घरी झाला होता. त्यांनी सुरुवातीचे 20 वर्ष ही गोरेगावच्या चाळीच्या घरात काढली. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात असं काही झालं की त्यांचं संपूर्ण आयुष्य बदललं आणि त्यांना लोक एक हिरो म्हणून ओळखू लागले. या सगळ्याची सुरुवात कशी झाली असेल? असा प्रश्न तुम्हाला तर नक्कीच आला असेल... तर त्याची सुरुवात ही त्यांच्या वडिलांमुळे झाली होती. जीतेंद्र यांच्या वडिलांनी त्यांना वी. शांताराम यांच्या नवरंग या चित्रपटाच्या सेटवर दागिणे पोहोचवण्यास सांगितले होते. (Jeetendra Birthday Special)

त्यावेळी त्यांना कळलं की मुलीचे कपडे परिधान करत आगीत उडी मारली तर एक्स्ट्रा पैसे मिळतील तर जितेंद्र यांनी अभिनेत्रीचे बॉडी डबल होण्याचा निर्णय घेतला. इथूनचं जीतेंद्र यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात झाली. त्यानंतर जीतेंद्र यांनी नवरंग या चित्रपटात छोटी-मोठी काम केली. जीतेंद्र यांनी जवळपास 200 चित्रपट केले. 

नवरंग या चित्रपटाच्या सेटवर जेव्हा जीतेंद्र पोहोचले होते तेव्हा त्यांनी पाहिलं की दिग्दर्शक वी. शांताराम ही काळजीत होते. एका सीनमध्ये हीरोइनला आगीत उडी घ्यायची होती. त्यासाठी दिग्दर्शकांनी बॉडी डबलला बोलावलं होतं. पण इतका डेन्जरस स्टंट पाहता त्या मुलीनं देखील नकार दिला. तर चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणाऱ्या संध्या या वी. शांताराम यांच्या पत्नी होत्या. त्यामुळे त्यांची इच्छा होती की त्यांना काही व्हायला नको. जेव्हा कोणी तयार झालं नाही तेव्हा जीतेंद्र यांनी ही भूमिका साकरण्याची इच्छा व्यक्त केली. जीतेंद्र यांना संध्या यांच्यासारखे तयार करण्यात आले. त्यानंतर जीतेंद्र यांच्या मदतीनं तो सीन पूर्ण होऊ शकला आणि वी. शांताराम यांना देखील खूप आनंद झाला.  

हेही वाचा : 'ही' ठरली करिअरमधील मोठी चूक, Dino Morea चा मोठा खुलासा

जीतेंद्र यांना खरी लोकप्रियता ही 1967 मध्ये प्रदर्शित झालेल्या फर्ज या चित्रपटातून मिळाली होती. या चित्रपटातील 'मस्त बहारों का मैं आशिक' हिट ठरलं होतं. त्या चित्रपटातील जीतेंद्र यांची स्टाईल प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्यांचे कपडे आणि बूट ही सगळ्यांना हवी होती. त्यानंतर जीतेंद्र यांनी पाठीवळून पाहिलं नाही.  

जीतेंद्र यांचे पत्नीचे नाव शोभा आहे. तर त्या दोघांना दोन मुलं असून मुलीचे नाव एकता कपूर असून ती छोट्या पडद्यावरील लोकप्रिय निर्माती आहेत. तिनं खरी सास-बहू ड्रामाची सुरुवात केली आहे. मुलाचे नाव तुषार कपूर आहे. तुषार हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे.