Farhan Akhtar Daughter Birth Certificate: जावेद अख्तर यांचा मुलगा फरान अख्तरही बॉलिवूडमध्ये प्रचंड सक्रिय आहे. सोबतच त्याची अनेकदा चर्चाही असते. तो अभिनेता आणि उत्तम दिग्दर्शकही आहे. त्याचे पहिले लग्न हे अधूना बाभानी हिच्याशी झाले होते. 2000 साली त्यांचे लग्न झाले होते आणि मग 2017 त्यांनी घटस्फोट घेतला होता. तब्बल 17 वर्षांचा त्यांचा संसार त्यांनी संपवला होता. त्यांना दोन मुलीदेखील आहेत. शाक्या आणि अकिरा अशी त्या दोघींची नावं आहेत. सध्या फरान अख्तरच्या मुलींचीही चर्चा आहे. त्यांच्या जन्माच्या दाखल्यावर रिलिजन सेक्शनमध्ये (धर्म विभागात) Not Applicable असं लिहिलं आहे. सध्या याची जोरात चर्चा आहे. असं लिहिण्यामागील कारण काय याबद्दल फरान अख्तरचे वडिल जावेद अख्तर यांनी याबाबत खुलासा केला आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे.
फरान अख्तरनं मागच्या वर्षी शिबानी दांडेकर हिच्याशी लग्न केले. त्यावेळी संपुर्ण कुटुंबिय आणि मित्रपरिवार हे उपस्थित होते. जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नी हनी इराणी त्याचसोबत शबाना आझमी याही आलेल्या होत्या. फरान अख्तरच्या दोन्ही मुलीही यावेळी उपस्थित होत्या. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा होती. यावेळी आपल्या मुलींच्या जन्म दाखल्याच्या धर्म विभागात Not Applicable का लिहिले आहे यावर जावेद अख्तर यांनी खुलासा केला आहे. बिग बॉस ओटीटी 2 चा स्पर्धक सायरस याला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा जावेद अख्तर यांनी केला आहे. आपल्या मुलांना त्यांनी अशाप्रकारेच शिक्षण दिले आहेत असं त्यांनी यावेळी नमुद केले होते. तेच त्यांनी आपल्या मुलांच्या पुढील पिढीकडेही सोपवले आहेत.
हेही वाचा : लग्नाची मागणी अन्... फ्रेंच मुलीच्या अखंड प्रेमात होते जावेद अख्तर; स्वत: केला खुलासा
यावेळी ते म्हणाले की, ''मला नाही वाटत की कुठला क्रॅश क्रॉस या मुलांना नैतिक मुल्यांबद्दल शिकवून शकेल. आयुष्यातील अनेक धडे हे मुलांना प्रत्यक्ष उदाहरणावरून दिले जातात. मुलं तेच करतात जे मोठी माणसं त्यांना करायला सांगतात. त्याचसोबत ते तेच करतात जेव्हा ते आपल्याला करताना पाहतात. त्यावरून ते पाहतात आणि समजतात की तुमची मॉरल व्हल्यू काय आहे सोबतच तुमचे विचार काय आहेत. तुम्ही आपल्या आयुष्यात कोणत्या गोष्टींमुळे आनंदी राहतात. तुमच्यासाठी महत्त्वाचं काय आहे हेच दुसऱ्यांकडे परावर्तित होते.'' अशी माहिती त्यांनी दिली.
त्यांच्या नातींच्या बर्थ सर्टिफिकेटबद्दल बोलताना ते म्हणाले की, ''त्यांनी सांगितले की त्यांच्या नातींच्या जन्म दाखल्यात त्यांनी धर्म विभागात नॉट अॅब्लिकेबल असं लिहिलं आहे. नैतिक मुल्यं ही त्यातूनच येतात जिथे मुलं ही मोठी होत असतात. जि मॉरॅलिटी, अॅटिट्यूड आपल्या चहूबाजूला असेल त्यातून दोन रिएक्शन येऊ शकतात. एकतर तुम्ही त्याच्याशी अनुरूप व्हा अथवा त्याच्याविरूद्ध जा.';