'जवानी जानेमन' लवकरच येणार चाहत्यांच्या भेटीला

'जवानी जानेमन' चित्रपट एक कौटुंबिक विनोदी कथेवर आधारीत आहे. 

Updated: May 7, 2019, 08:45 PM IST
'जवानी जानेमन' लवकरच येणार चाहत्यांच्या भेटीला title=

मुंबई : 'गोलमाल' आणि 'अंधाधुन' चित्रपटाच्या यशस्वी कामगिरीनंतर अभिनेत्री तब्बू तिच्या पुढील वाटचालीस सज्ज झाली आहे. 'जवानी जानेमन' या चित्रपटाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. जॅकी भगनानी यांच्या 'पूजा एंटरटेनमेंट', सैफ अली खानचा 'ब्लॅक नाइट' आणि जय शेवक्रमणि यांची 'नॉर्दर्न लाइट्स फिल्म्स' यांच्या द्वारे चित्रपट निर्मित करण्यात येणार आहे. नितिन कक्कड चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धूरा हाती घेणार आहेत. 

'जवानी जानेमन' चित्रपट एक कौटुंबिक विनोदी कथेवर आधारीत आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटात आजच्या पिढीतील मुलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. एक व्यक्ती त्याच्या जीवनातील कठिण प्रसंगावर कशा प्रकारे मात देतो, याचे उत्तम उदाहरण चित्रपटाच्या मध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

चित्रपटात अभिनेत्री तब्बू मुख्य भूमिका साकारणार आहे. त्याचप्रमाणे पूजा बेदी यांची मुलगी अलिया चित्रपटात डेब्यू करणार आहे. मोठ्या कालावधी नंतर तब्बू आणि अभिनेता सौफ अली खान एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. १९९९ साली आलेल्या 'हम साथ साथ' चित्रपटात त्यांनी एकत्र भूमिका साकारली होती. तर ४५ दिवसांचे पहिले शेड्यूल लंडनमध्ये चित्रीत करण्यात येणार आहे. शुटिंग १ जून रोजी सुरू होणार आहे.