नव्या वर्षात अभिनेत्री जस्मिन भसीनने फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

टीव्ही स्टार जस्मिन भसीन नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Updated: Jan 3, 2022, 08:45 PM IST
नव्या वर्षात अभिनेत्री जस्मिन भसीनने फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज title=

मुंबई : टीव्ही स्टार जस्मिन भसीनने नुकतंच मुंबईत नवीन घर घेऊन तिचं स्वप्न पूर्ण केलं. हे घर घेणं हे तिचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल असल्याचं अभिनेत्रीने मुलाखतीत सांगितलं. जस्मिनने 2015 मध्ये टशन-ए-इश्क या मालिकेतून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.

या घरासाठी तिने खूप मेहनत घेतली
जस्मिनने तिच्या मुलाखतीत सांगितले की, 'मी 10-12 वर्षांपूर्वी मुंबईत आले. त्यामुळे माझ्या डोक्यावर छप्पर नव्हतं. मी खूप कष्ट केले. जेणेकरून मी नेहमी स्वप्नात पाहिलेलं जीवन जगू शकेन. छान घरात आणि सुरक्षित वातावरणात राहीन. ही एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे आणि मला वाटतं की, व्यावसायिकदृष्ट्या मोठ्या यशासाठी मला अधिक मेहनत करावी लागेल.

म्युझिक व्हिडिओनंतर मागे वळून पाहिलं नाही
जस्मिनने गेल्या वर्षभरात अनेक म्युझिक अल्बममध्ये काम केलं आहे. त्याबद्दल बोलताना ती म्हणाली, ''मी गाणी खूप बघायचे आणि त्यात मी लीडडान्सर नाचत असल्याची कल्पना करायचे. जेव्हा मला पहिल्यांदा एका म्युझिक व्हिडिओची ऑफर मिळाली, जो एका चांगल्या गायकाने गायला होता. मी लगेच हो म्हणाले आणि त्यानंतर मी कधी मागे वळून पाहिलंच नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

घर खरेदी केल्यानंतर, जस्मिनचा बॉयफ्रेंड अली गोनीने तिच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिलं, 'मला तुझा खूप अभिमान आहे,  तुझ्या नवीन घराबद्दल अभिनंदन, मला माहित आहे की तू यासाठी किती मेहनत घेतली आहेस. त्यानंतर अलीच्या कमेंटवर रिप्लाय करत जास्मिनने लिहिलं की, "आपलं घर."