अनुप जलोटाला दिलेल्या 'त्या' किसवर जसलीन मथारु म्हणाली...

भजन सम्राट अनुप जलोटा आणि त्यांची प्रेयसी जसलीन मथारु यांच्यातील केमिस्ट्री.

Updated: May 11, 2021, 05:35 PM IST
अनुप जलोटाला दिलेल्या 'त्या' किसवर जसलीन मथारु म्हणाली...  title=

मुंबई: ‘बिग बॉस’ या रिअलिटी शोच्या प्रत्येक पर्वाची कलाविश्वात बरीच चर्चा पाहायला मिळते. त्यातीलच एक कारण म्हणजे भजन सम्राट अनुप जलोटा आणि त्यांची प्रेयसी जसलीन मथारु यांच्यातील केमिस्ट्री. आपल्याहून वयाने ३७ वर्षे लहान असणाऱ्या तरुणीला डेट करणाऱ्या जलोटा आणि जसलीन यांच्या केमिस्ट्रीविषयी काही वेगळं सांगण्याची गरजच नाही. शोमध्ये जसलीनने अनुप जलोटा यांना किस केलं होतं. त्यानंतर बिग बॉसच्या घरात आणि बाहेर देखील त्यांच्या किसची चांगलीचं चर्चा रंगली होती. 

अखेर यावर जसलीनने बॉलीवुड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. 'बिग बॉस हा शो फक्त प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. मला आणि अनुप यांना डेटसाठी पाठवण्यात आलं होतं. पण ती डेट तशी नव्हती. आपण नातेवाईकांसोबत डेटवर जात नाही?. जेव्हा आपण व्हेलेंटाईन डे साजरा करतो. तेव्हा आपण आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत डेटवर जातो .'

जसलीन पुढे म्हणाली , 'मी माझ्या आई-वडिलांसोबत डेटवर जात नाही? मी जाऊ शकते. त्याचप्रमाणे मी अनुप यांच्यासोबत डेटवर गेली. मला वाटतं नाही त्यामध्ये लव्ह एंगलच्या दृष्टीने पाहाणं योग्य ठरेलं. तेव्हा मी त्यांना किसपण केलं आणि असं पण सांगितलं की माझ्या लिपस्टिकचे डाग पुसू नका. मी अशीचं आहे. त्यामुळे मला यात काही वाईट वाटत नाही.'

दरम्यान, बिग बॉस फेम ही जोडी  'वो मेरी स्टुडंट है' या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्याचे मनोरंजन करणार आहेत. या चित्रपटाची कथा अनुप जलोटा आणि जसलीन मथारू यांच्या नात्या भोवती फिरताना दिसत आहे. चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या नात्याचं वास्तव रूप जगासमोर येणार आहे. या जोडीच्या चर्चा संपूर्ण देशभर पसरल्या होत्या.