एका आठवड्यानंतर जान्हवीच्या आयुष्य़ातील मोठा दिवस, पहिल्यांदा आई नसणार सोबत

श्रीदेवीच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईत अनेक सेलिब्रेटी कलाकार तसेच सामान्य चाहत्यांची मोठी गर्दी झालीये. गेल्या आठवड्यात श्रीदेवी दुबईत कौटुंबिक सोहळ्यासाठी गेली होती. यादरम्यान तिचे दुबईत निधन झाले. तिच्या अचानक जाण्याने संपूर्ण देशातील जनतेला मोठा धक्का बसलाय.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Feb 28, 2018, 01:13 PM IST
एका आठवड्यानंतर जान्हवीच्या आयुष्य़ातील मोठा दिवस, पहिल्यांदा आई नसणार सोबत title=

मुंबई : श्रीदेवीच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईत अनेक सेलिब्रेटी कलाकार तसेच सामान्य चाहत्यांची मोठी गर्दी झालीये. गेल्या आठवड्यात श्रीदेवी दुबईत कौटुंबिक सोहळ्यासाठी गेली होती. यादरम्यान तिचे दुबईत निधन झाले. तिच्या अचानक जाण्याने संपूर्ण देशातील जनतेला मोठा धक्का बसलाय.

दोन्ही मुलींवर दु:खाचा डोंगर

श्रीदेवीच्या जाण्याने तिच्या दोन्ही मुलींवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. आपल्या आईचे पार्थिव पाहून जान्हवी आणि खुशी या अक्षरश: कोसळल्या. सोनम कपूरने त्यांना सावरले. 

जान्हवीचा 21वा वाढदिवस

येत्या 7 मार्चला जान्हवीचा 21 वा वाढदिवस आहे. दरवर्षी आईसोबत वाढदिवस साजरा करणारी जान्हवीसोबत यंदा मात्र आई नसणार आहे. गेल्या वर्षी जान्हवीच्या वाढदिवसानिमित्त श्रीदेवीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर खास पोस्ट शेअर केली होती. 

फोटो शेअर करताना श्रीदेवी म्हणाली, 'Happy birthday to my angel, the most precious thing to me in the world, wish you the best birthday my baby love you'

जान्हवी हे श्रीदेवी आणि बोनी कपूरचे पहिले अपत्य. त्यामुळे तिचे जरा जास्तच लाड झाले. प्रत्येक कार्यक्रमात श्रीदेवीला जान्हवीला घेऊन जात असे.