OMG! जान्हवी कपूरला मिळाला मोठा सिनेमा, रणवीर सिंहसोबत करणार काम

अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर सध्या ‘धडक’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात ती ईशान खट्टरसोबत दिसणार आहे.

Amit Ingole Amit Ingole | Updated: Jan 30, 2018, 08:26 AM IST
OMG! जान्हवी कपूरला मिळाला मोठा सिनेमा, रणवीर सिंहसोबत करणार काम title=

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर सध्या ‘धडक’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात ती ईशान खट्टरसोबत दिसणार आहे.

करण जोहरच्या हा सिनेमा ‘सैराट’चा रिमेक आहे. रिमेक करताना यात काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे हिंदी रिमेकला किती पसंती मिळते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. 

रोहित शेट्टीच्या या सिनेमाची ऑफर

‘धडक’मधील तिचं काम बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतानाच आता जान्हवीला आणखी एक मोठा सिनेमा मिळाला आहे. ड्रेक्कन क्रॉनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित शेट्टीच्या आगामी ‘सिंबा’ सिनेमाची जान्हवीला ऑफर मिळाली आहे. या सिनेमात ती रणवीर सिंहसोबत दिसणार आहे. 

मुख्य भूमिकेत दिसण्याची शक्यता

मीडिया रिपोर्टनुसार, जान्हवी या सिनेमात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसू शकते. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंबा’मध्ये आत्तापर्यंत अभिनेत्री फायनल झाली नाहीये. रोहितला या सिनेमासाठी नवा चेहरा हवा आहे. 

अजून फायनल नाही?

जान्हवी कपूरने याबाबत अजूनतरी अधिकृत घोषणा केलेली नाहीये. त्यामुळे याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.