आतून तुटली आहे अभिनेत्री जान्हवी कपूर, जाणून घ्या काय आहे प्रकरण

जान्हवी कपूरने खूप कमी वेळात इंडस्ट्रीमध्ये स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केलं आहे. 

Updated: Aug 15, 2021, 08:05 PM IST
आतून तुटली आहे अभिनेत्री जान्हवी कपूर, जाणून घ्या काय आहे प्रकरण title=

मुंबई : बॉलिवूडची धाडसी अभिनेत्री आणि श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरने खूप कमी वेळात इंडस्ट्रीमध्ये स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केलं आहे. आज तिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

अपल्या अदांनी लावलं वेड
जान्हवी कपूरच्या अभिनयाबरोबरच तिच्या स्टायलिश शैलीबद्दलही चाहते वेडे आहेत. आपल्या चाहत्यांशी जोडलेलं राहण्यासाठी, जान्हवी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि दररोज तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. अनेक लोक जान्हवीच्या सौंदर्याने मोहित झाले आहेत.

जान्हवी हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली 
आता पुन्हा एकदा जान्हवी कपूर तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. वास्तविक, अलीकडेच जान्हवीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे, मात्र या फोटोंसोबत दिलेलं कॅप्शन चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या फोटोशूटमध्ये जान्हवी हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत असून ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टला आतापर्यंत 3 लाख 80 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

फोटो शेअर करत जान्हवी कपूरने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "आम्ही सगळे थोडे तुटलेले आहोत ... आणि अशाप्रकारे प्रकाश आपल्यामध्ये प्रवेश करतो". अभिनेत्रीच्या या पोस्टला आतापर्यंत 3 लाख 80 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहत्यांशिवाय अनेक सेलेब्स त्यांच्या पोस्टला पसंती देत ​​आहेत. आता जान्हवीची हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या चित्रपटांमुळे जान्हवी चर्चेत आहे
जान्हवी कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने 2018 मध्ये धडक या चित्रपटातून आपला चित्रपट प्रवास सुरू केला. जान्हवी कपूर हॉरर कॉमेडी सिनेमा 'रुही' मध्ये दिसली होती. या चित्रपटातील तिचा अभिनय चाहत्यांना आवडला. तिच्या आगामी चित्रपटांमध्ये 'दोस्ताना 2' आणि 'गुड लक जेरी' यांचा समावेश आहे.