मुंबई : पहिल्याच सिनेमातून आपल्या अभिनयाची कसब दाखवणारी जान्हवी तिच्या फॅशनच्या बाबतीतही कायम चर्चेत असते. श्रीदेवी मुलगी म्हणून तिचं वेगळेपण आहेच. पण आताच्या काळातही सौंदर्य जपत जान्हवी आपल्यासमोर प्रत्येकवेळी आली आहे.
नुकतंच जान्हवीने तिची स्टायलिस्ट तान्या घावरीच्या मदतीने हे फोटोशूट केलं आहे. हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले असून यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
लाल रंगाच्या ड्रेसमध्या जान्हवीचं सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे. तसेच तिचा हा लूक पहिल्या फोटोंपेक्षा वेगळा आहे.
जान्हवी कपूरने करण जोहरच्या 'धडक' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. धडक हा सिनेमा सैराट सिनेमाचा रिमेक आहे.
जान्हवी कपूर यावर्षी करण जोहरच्या कॉफी विथ करण या एपिसोडमध्ये देखील आली आहे. यावेळी ती भाऊ अर्जुन कपूरसोबत शोमध्ये दिसली. या शोमध्ये एकमेकांची खूप मस्ती करताना अर्जुन आणि जान्हवी दिसली.
भारतीय वायुसेनेतील पहिल्या महिला वैमानिक गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर साकारल्या जाणाऱ्या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी जान्हवीची वर्णी लागली आहे. सोशल मीडियावर सध्या तिच्या याच आगामी चित्रपटातील लूक व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये जान्हवी वायूदलाच्या गणवेशात दिसत असून, तिचा हा लूक अत्यंत लक्षवेधी ठरत आहे.