जॅकलिनच्या हॉट पोल डान्सचा सोशल मीडियात धुमाकूळ

सोशल मीडियात बॉलिवूडच्या काही अभिनेत्री सध्या चांगल्या चर्चेत आल्या आहेत. त्या अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिचाही नंबर लागतो.

Updated: Aug 11, 2017, 07:35 PM IST
जॅकलिनच्या हॉट पोल डान्सचा सोशल मीडियात धुमाकूळ title=

मुंबई : सोशल मीडियात बॉलिवूडच्या काही अभिनेत्री सध्या चांगल्या चर्चेत आल्या आहेत. त्या अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिचाही नंबर लागतो.

जॅकलिन तिच्या आगामी ‘जंटलमन’ सिनेमामुळे तर चर्चेत आहेच शिवाय तिच्या पोल डान्समुळेही ती चर्चेत आली आहे. जॅकलिनने तिचा एक पोल डान्सचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. तिच्या जंटलमन सिनेमातील ‘चंद्रलेखा’ या गाण्याला जोरदार प्रतिसाद मिळतो आहे. या गाण्यात तिने पोल डान्स केला असून या पोल डान्सची तिला इतकी सवय झालीय की आपल्या नव्या घरी तिने खास एक पोल बसवून घेतला आहे. 

डान्स प्रॅक्टीस आणि फिटनेस अशा दोन कारणांसाठी तिने घरातच पोल बसवून घेतला आहे. या पोलवर प्रॅक्टीस करतानाचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. जॅकलिन आपल्या फिटनेसबद्दल किती सिरीअस आहे, हे सुद्धा या व्हिडिओतून बघायला मिळतं.