मुंबई : बॉलीवुडची टॉपटी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचा रेस ३ सिनेमा ईदच्या शुभमुहूर्तावर रिलीज होत आहे. सलमान खान आमि जॅकलिन यांच्या आगामी रेस ३ सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. सिनेमाची शूटींग जॅकलिनसाठी अजिबात सोपी नव्हती. यावेळी जॅकलीनच्या डोळ्याला दुखापत झाल्याचे समोर आले होते. आता जॅकलीनचा एक्शन करतानाचा व्हिडिओ समोर आलायं. एक्शनची ट्रेनिंग घेतानाचा एक व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये ती स्ट्रेचिंग करताना दिसतेय. ही काही सर्वसाधारण स्ट्रेचिंग नाही. ८ तासांत या व्हिडिओला ५१ लाखाहून अधिक व्ह्यू मिळाले आहेत.
जॅकलिनने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या हेल्थशी संबंधित पोस्ट शेअर केली आहे. 'ही एक कायमस्वरूपी दुखापत आहे. माझ्या डोळ्याचा आयरिस कधी पूर्ण गोल होणार नाही. तरीही मी आज जग बघु शकते ही फार मोठी गोष्ट आहे.' असे तिने लिहिले आहे. याआधी जॅकलिनचा व्हिडिओ समोर आला होता. त्यामध्ये ती 'हिरिए' ची शूटींग करताना वाईट पद्धतीने जखमी झाली होती. सिनेमातील 'हिरिए' गाणंदेखील प्रेक्षकांच्या चांगलच पसंतीस पडलं. यामध्ये ती सलमानसोबत पोल डान्स करताना दिसली. रेमो डिसूजा दिग्दर्शित रेस ३ हा सिनेमा १५ जूनला प्रदर्शित होणार आहे. रेस सीरीजच्या पहिल्या दोन सिनेमात सैफ अली खान प्रमुख भूमिकेत होता. पण रेस ३ मध्ये सलमान खान झळकणार आहे. चाहत्यांबरोबरच सलमानही या सिनेमासाठी अत्यंत उत्सुक आहे.