VIDEO : यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासून अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या आयुष्यातील एका नव्या पर्वाची सुरुवात केली. अर्थात हे पर्व त्यांच्या खासगी आयुष्यात एक नवी पहाट, एक नवी सकाळ घेऊन आलं, असं म्हणायला हरकत नाही. सोनम कपूर पासून ते दीपिका पदुकोणपर्यंत बरेच सेलिब्रिची लग्नाच्या बेडीत अडकले. लग्नसराईचं हेच वातावरण वर्षाच्या अखेरीसही कायम आहे.
रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची मुलगील इशा अंबानी हिच्या विवाहसोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून इशाच्या लग्नसोहळ्याच्याच निमित्ताने काही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून त्यात कार्यक्रमातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सेलिब्रिटी पाहुण्यांच्या उपस्थितीत होणारे समारंभ आणि त्यांच्या व्हिडिओंमध्ये सध्या लक्ष वेधतोय तो म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या नातीचा, म्हणजेच आराध्या बच्चनचा व्हिडिओ.
उदयपूरमध्ये पार पडलेल्या इशाच्या संगीत सोहळ्यादरम्यानच्या या व्हिडिओमध्ये आराध्याही तिच्या आईसोबत कार्यक्रमाचा आनंद घेताना दिसत आहे. जैसलमेरमध्ये आपल्या नृत्यशैलीमुळे ओळखल्या जाणाऱ्या क्वीन हरिशसोबत आराध्याही नृत्य करताना दिसत असून ऐश्वर्या तिच्याकडे मोठ्या कुतूहलाने पाहत आहे.
क्वीन हरिशनेच सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ पोस्ट केला असून, आतापर्यंत भेटलेल्या अभिनेत्रींपैकी ऐश्वर्या ही सर्वात जास्त समंजस व्यक्ती असल्याचं या ट्विटमधून स्पष्ट केलं.
Huge respect for the one and only #AishwaryaRaiBachchan #AaradhyaBachchan
So humble and kind actress that I ever met in my life.@juniorbachchan @SrBachchan @TBReporter @karanjohar @ManishMalhotra pic.twitter.com/EnkT4kEWfi— Queen Harish (@queenharish) December 9, 2018
आराध्याही क्वीन हरिशच्या पेहरावाकडे आणि नृत्याकडे मोठ्या उत्सुकतेने आणि कुतूहलपूर्ण नजरेने पाहात असून, नृत्य करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांच्याच पसंतीस उतरत असून, खऱ्या अर्थाने आई आणि मुलीची ही सॉलिड टीम चाहत्यांच्या मनात घर करत आहे, असंच म्हणावं लागेल.