अज्ञात व्यक्तीचा धक्कादायक खुलासा म्हणाला, 'सचिन तेंडूलकरची मुलगी माझी पत्नी आहे'

सचिन तेंडूलकरचं फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. तिच्या मुलीचंही फॅन फॉलोईंग एखाद्या सेलिब्रिटी पेक्षा कमी नाहीये. नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असणारी सारा तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते.

Updated: Apr 10, 2023, 08:58 PM IST
अज्ञात व्यक्तीचा धक्कादायक खुलासा म्हणाला, 'सचिन तेंडूलकरची मुलगी माझी पत्नी आहे' title=

मुंबई : सेलिब्रिटींप्रमाणेच सध्या चर्चेत असतात स्टार किड्स. पण यावेळी चर्चा होतेय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या लेकीची. सचिन तेंडुलकरला क्रिकेट विश्वाचा देव मानला जातो. मात्र यावेळी सचिन चर्चेत नाहीये तर त्याची लेक सारा तेंडूलकर चर्चेत आली आहे. 

सचिन तेंडूलकरचं फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. तिच्या मुलीचंही फॅन फॉलोईंग एखाद्या सेलिब्रिटी पेक्षा कमी नाहीये. नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असणारी सारा तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. साराने एखादी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच ती काही सेकंदाच व्हायरल होते. नेहमीच आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असणारी सारा आता मात्र एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. 

यावेळी एका अज्ञात व्यक्तीने असा दावा केला आहे की, सचिनची लेक म्हणजेच सारा तेंडूलकर त्याची पत्नी आहे. जे ऐकून तुमच्याही पाया खालची जमिन नक्कीच सरकेल. आज आम्ही तुम्हाला या संपूर्ण प्रकाराबद्दल सांगणार आहोत. जाणून घेवूया या संपूर्ण प्रकरणाबद्दल.

नेमकं काय आहे हे प्रकरण
कधी-कधी चाहते त्यांच्या लाडक्या स्टार्ससाठी काय करतील याचा नेम नाही. असाच काहीसा प्रकार सारासोबत घडला आहे. त्याने जे तिच्यासाठी केलंय याचा तुम्हा स्वप्नातही विचार करु शकत नाही. या चाहत्याने साराचा विनभंग केल्याचं प्रकरण सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

एका अज्ञात व्यक्तीने साराला वारंवार फोन करुन त्रास देत होता. त्याने असं म्हटलं आहे की, तो साराच्या प्रेमात वेडा आहे. त्याला तिच्याशिवाय काहीच दिसत नाही. या अज्ञात व्यक्तीचं नाव देवकुमार मैती असं आहे. देवकुमारने साराच्या घरी २० हून अधिक कॉल केले आहेत. यानंतर सारानने त्याच्यावर पोलिस तक्रारही दाखल केली. रिपोर्टमध्ये साराने म्हटलं की, देवकुमार मैती नावाची व्यक्ती तिला सतत फोन करुन त्रास देतो आणि तो तिचा पती असल्याचंही सांगतो. 
 
यानंतर सचिन तेंडुलकरच्या कुटुंबीयांनी आरोपीविरुद्ध वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.  या लेखी तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केलं आहे. या गोष्टीची चौकशी केली असता आरोपी पश्चिम बंगालचा रहिवासी होता. ती व्यक्ती मानसिक आजारी असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. 

पोलिसांनी आरोपीच्या घरातून एक डायरी जप्त केली आहे, ज्यामध्ये आरोपी देवकुमारने सचिन तेंडुलकरच्या मुलीचे नाव पत्नी म्हणून लिहिले होते.  त्याने कबूल केले की त्याने सामन्यादरम्यान साराला टीव्हीवर पाहिले होते, तेव्हापासून तो तिच्या प्रेमात पडला होता.