केएल राहुल 'या' अभिनेत्याच्या मुलीला करतोय डेट?

केएल राहुलचा 'या' अभिनेत्याच्या मुलीसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे.

Updated: Jun 28, 2019, 06:47 PM IST
केएल राहुल 'या' अभिनेत्याच्या मुलीला करतोय डेट? title=

मुंबई : विश्वचषक २०१९ मध्ये टीम इंडिया जबरदस्त कामगिरी करत आहे. सध्या सगळीकडे वर्ल्डकपची चर्चा असताना भारतीय क्रिकेटपटू केएल राहुलचीही खास चर्चा सुरु आहे. सध्या केएल राहुल त्याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. क्रिकेटपटू केएल राहुल बॉलिवूड अभिनेत्री आणि सुनिल शेट्टीची मुलगी आथिया शेट्टीला डेट करत असल्याची चर्चा आहे. केएल राहुलचा आथियासोबतचा फोटो व्हायरल झाला आहे.

एका मैत्रिणीमुळे लोकेश आणि आथिया यांची मैत्री झाली. दोघांचीही कॉमन मैत्रिण असणाऱ्या आकांक्षा रंजनने तिच्या सोशल मीडियावरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आथिया आणि राहुलही दिसत आहेत. आकांक्षा रंजनने हा फोटो एप्रिल महिन्यात पोस्ट केला आहे. 

 
 
 
 

A post shared by Kanch (akansharanjankapoor) on

'बॉलिवूड लाइफ डॉट कॉम'ने दिलेल्या वृत्तानुसार, केएल राहुल आणि आथिया शेट्टी फेब्रुवारी महिन्यापासून एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे. मात्र, या दोघांनाही याबाबत विचारलं असता त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

याआधी केएल राहुलचं नाव बॉलिवूडच्या सोनल चौहान आणि निधि अग्रवाल या अभिनेत्रींशीही जोडण्यात आलं होतं.

आता, आथिया आणि केएल राहुलच्या डेटिंगच्या चर्चांमध्ये किती तथ्य आहे ते येणाऱ्या काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.