Kareena Kapoor तिसऱ्यांदा प्रेग्नेंट?

आजकाल सगळ्या सेलिब्रेटी हिरोईन्स या एकापाठोपाठ गुडन्यूज देत आहे. 

Updated: Jul 16, 2022, 02:11 PM IST
Kareena Kapoor तिसऱ्यांदा प्रेग्नेंट? title=

Kareena Kapoor Baby Bamp: सध्या बॉलीवूडमधील एका पाठापोठ एक होणारी लग्नसराई पाहून सगळ्यांच्या नजरा खिवळल्या आहेत त्या अभिनेत्रींच्या गुड न्यूज भोवती. आजकाल सगळ्या सेलिब्रेटी हिरोईन्स या एकापाठोपाठ गुडन्यूज देत आहे. आता आलियाच्या गुड न्यूजनंतर कतरिनाच्या गुड न्यूजची जोरदार चर्चा आहे. कतरिनाच्या बेबी बंपची तर चर्चा जोरात चालत असताना आता या एका मोठ्या अभिनेत्रीच्या पेग्नन्सीची भलतीच चर्चा आहे. 

करिना कपूर खान नुकतीच नीतू कपूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने पार्टी शार्टीमध्ये मजा करताना दिसली. तिच्यासोबत सैफ अली खानही होता तसेच अख्ख्या करिश्मा कपूरसोबत अख्ख्या फॅमिलीसोबत तिने लंच एन्जॉय केला होता. करीना कपूर खान सध्या पती सैफ अली खान आणि मुलं तैमूर आणि जेहसोबत लंडनमध्ये सुट्टी एन्जॉय करतानाही दिसते आहे. याआधी तिने तिची सख्खी बहिण करिश्मा कपूर आणि बीएफएफ नताशा पूनावाला आणि अमृता अरोरासोबत एक फोटोशूट शेअर केले होते. त्यामुळे गेल्या काही  दिवसांपासून बेबो आपले लंडनचे हटके तसेच सैफसोबतचे रॉमेंटिक फोटो शेअर करताना दिसते आहे. 

करिना कपूर खानच्या पहिल्या पेग्नंन्सीची जेवढी चर्चा झाली  त्याहूनही जास्त चर्चा रंगली आहे ती तिच्या तिसऱ्या गुडन्यूजची...सैफ आणि करीनाला तैमूर आणि जेह ही दोन मुलं आहेत, ज्यांच्यासोबत दोघेही आईवडिल चांगलेच टाईम स्पेंड करतानाही दिसतात त्यातून आता करिना या दोघांशिवाय तिसऱ्या बाळाचाही विचार करते आहे की काय अशी बातमी चांगलीच व्हायरल होते आहे कारण सध्या व्हायरल होणाऱ्या करिनाच्या फोटोंमधून ती आपले बेबी बंप लपवताना दिसते आहे. फोटोंमध्ये कधी ती सैफच्या मागे तर कधी करिष्माच्या मागे फिरताना, लपताना दिसते आहे. त्यातून नुकत्याच काही व्हायरल झालेल्या फोटोंमधून तर करिनाचे बेबी बंपही स्पष्ट दिसायला लागले आहे त्यामुळे तिने ते कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तिचे बेबी बंप समोर आले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या एक भलताच फोटो व्हायरल होताना दिसत आहे ज्यात करिना आपले बेबी बंप कॉफी कपमुळे लपवायचा प्रयत्न करत असली तरी त्याच्या ब्लॅक टॉपमधून मात्र ते स्पष्टपणे दिसते आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे की करिना आता तिसऱ्यांदा आई होणार आहे... समोर आलेल्या फोटोमध्ये ती सैफ आणि दूसऱ्या कुणासोबतरी दिसत आहे. हा फोटो व्हायरल होताना पाहून सोशल मीडिया यूजर्सही हैराण झाले आहेत. करीना कपूर प्रेग्नंट असल्याचे त्यांनाही वाटतं आहे त्यातून आता हा जूना फोटो नसून नवाचा फोटो असल्याचा दावाही चाहते करत आहेत कारण करिना सध्या फारच बारिक झालेली पाहायला मिळते आहे.