दोन महिन्यांनंतर प्रभास अनुष्कासोबत करणार साखरपुडा?

‘बाहुबली २’ हा सिनेमाने मोठं यश मिळवलं. त्यानंतर प्रभास आणि अनुष्काच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगली होती. या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते.

Updated: Oct 4, 2017, 08:24 PM IST
दोन महिन्यांनंतर प्रभास अनुष्कासोबत करणार साखरपुडा? title=

मुंबई : ‘बाहुबली २’ हा सिनेमाने मोठं यश मिळवलं. त्यानंतर प्रभास आणि अनुष्काच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगली होती. या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते.

पण दोघांनीही यावर काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. याउलट प्रभास लग्नासाठी मुली बघत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. दोघांनीही कधीही त्यांच्या रिलेशनशिपवर खुलेपणाने भाष्य करणे टाळले होते. आता अशी माहिती समोर येतीये की, प्रभास आणि अनुष्का हे यावर्षी डिसेंबर महिन्यात साखरपुडा करणार आहेत. 

साऊथ एशियन सिनेमा मॅगझिनचे फिल्म क्रिटीक उमेर संधू यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘प्रभास आणि अनुष्का शेट्टी डिसेंबर महिन्यात होणार आहे. आता ते ऑफिशिअली रिलेशनशिपमध्ये आहेत’. 

‘बाहुबली’आधी या दोघांनी ‘बिल्ला’ आणि मिर्जी या सिनेमात एकत्र काम केलं होतं. नुकतीच बाहुबलीची पूर्ण टीम अभिनेत्री रविना टंडनसोबत पार्टी करतानाही दिसली होती. 

दुस-या एका मीडिया रिपोर्टनुसार, प्रभास हा लवकरच त्याच्या आणि अनुष्काच्या रिलेशनशीपबद्दल अधिकॄतपणे घोषणा करणार आहे. आता या दोन्ही बातम्या ख-या ठरल्या तर त्यांच्या चाहत्यांना मोठा आनंद होणार यात शंका नाही. पण अजूनही दोघांनी यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. असे होत असेल तर आतापासूनच आम्ही त्यांना शुभेच्छा देतो.