इरफान खानच्या प्रकृतीत सुधारणा ; लवकरच झळकणार या सिनेमात

बॉलिवूड अभिनेता इरफान खान गेल्या काही दिवसांपासून आजारी असून उपचारांसाठी तो परदेशात गेला आहे.

Updated: May 26, 2018, 10:31 AM IST
इरफान खानच्या प्रकृतीत सुधारणा ; लवकरच झळकणार या सिनेमात title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खान गेल्या काही दिवसांपासून आजारी असून उपचारांसाठी तो परदेशात गेला आहे. याचदरम्यान फिल्ममेकर आणि इरफान खानचे जवळचे मित्र शूजित सरकारने त्याच्या आगामी सिनेमाची 'उधम सिंह'ची घोषणा केली. या सिनेमात इरफान खान प्रमुख भूमिकेत दिसेल. शूजित आणि इरफान यांनी यापू्र्वी पीकू सिनेमात काम केले आहे. यानंतर दोघे उधम सिंह सिनेमातून एकत्र येणार आहेत. या सिनेमाचे शूटिंग या वर्षअखेरीपासून सुरु होईल. शुजित या वक्तव्यामुळे इरफान खानच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यातून ही गोष्ट झाली स्पष्ट

काही दिवसांपूर्वीच इरफान खानने सांगितले की, तो न्युरोएंडोक्राईन ट्यूमरशी लढा देत आहे. मात्र या सिनेमाच्या घोषणेमुळे इरफानच्या प्रकृतीत सुधारणा होत असून इरफान लवकरच काम सुरु करेल, हे गोष्ट स्पष्ट झाली आहे. इरफान खानची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असल्याचे शूजित यांनी यावेळी सांगितले. 

स्वातंत्र्यपूर्व काळातील कथा 

उधम सिंह मध्ये रणबीर सिंग प्रमुख भूमिकेत असेल अशी चर्चा होती. मात्र अक्टुबर सिनेमाच्या प्रमोशनवेळी शूजितने या अफवांना पूर्णविराम लागला. उधम सिंह हा शूजित यांचा ड्रिम प्रोजेक्ट असून गेल्या १८-१९ वर्षांपासून ते या सिनेमाच्या कथेवर काम करत आहेत. या सिनेमाची कथा स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे.