Ira Khan Wedding : इरा खानच्या हळदीत किरण रावचा मराठमोळा थाट, ट्रेडिशनल लुकमधील Video आला समोर

Kiran Rao In Ira Khan Wedding : सोशल मीडियावर आता इरा आणि नुपूर यांच्या समारंभाचे काही व्हिडीओ समोर येत आहेत. अशातच आता आमिर खानची पहिली पत्नी किरण रावचा एक व्हिडीओ समोर आलाय. 

सौरभ तळेकर | Updated: Jan 2, 2024, 03:47 PM IST
Ira Khan Wedding : इरा खानच्या हळदीत किरण रावचा मराठमोळा थाट, ट्रेडिशनल लुकमधील Video आला समोर title=
Kiran Rao In Ira Khan Wedding

Ira Khan Nupur Shikhare Wedding : सध्या बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा त्याची लेक इरा खान (Ira Khan) हिच्या लग्नाच्या गोंधळात आहे. इरा खान 3 जानेवारीला बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये आयरा आणि नुपूरने गुपचूप साखरपुडा उरकत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. साखरपुड्यानंतर दोघांच्या लग्नाच्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली होती. वांद्रे येथील ताज लँड अँड हॉटेलमध्ये दोघांच्या शाही लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आलंय. अशातच आता आमिर खानची दुसरी पत्नी किरण रावचा एक व्हिडीओ समोर आलाय. 

सोशल मीडियावर आता इरा आणि नुपूर यांच्या समारंभाचे काही व्हिडीओ (Ira Khan Wedding Video) समोर येत आहेत. अशातच इराच्या लग्नासाठी आता किरण राव देखील पोहोचली आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये किरणने जांभळ्या रंगाची सिल्क साडी नेसलेली दिसत आहे. किरणने महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये साडी घातली असून पारंपारिक लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या पारंपारिक लूकने अनेकांना प्रभावित केलंय. किरणने तिच्या केसांमध्ये गजरा घातला आणि हातात ब्रेसलेटही घातलंय.

पाहा Video

अमिर खानची लेक ही पारंपारिक विवाहाअगोदर शासकीय पद्धतीने नुपूर शिखरेसोबत लग्न करणार आहे. ईरा खान आणि नुपूर शिखरे 3 जानेवारीला कोर्ट मॅरेज  करणार आहेत. त्यानंतर 6 जानेवारीपासून त्यांच्या लग्नपूर्व विधिंना सुरुवात होईल. 3 जानेवारी या तारखेला इरा आणि नुपूर पहिल्यांदा डेटवर गेले होते. नुपूरने एका स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये आयराला गुडघ्यावर बसवून प्रपोज केलं होतं. त्यावेळी इराने त्याला होकार देखील दिला होता.

दरम्यान, लग्नानंतर हे कपल 10 जानेवारीला मुंबईत ग्रँड रिसेप्शन देणार आहे. या रिसेप्शनला चित्रपट जगतातील अनेक दिग्गज व्यक्ती येणार असल्याचे बोलले जातंय.