आयरा- नुपूर आणि 'ती'; आमिरच्या लेकीच्या लग्नात कोण हसलं, कोण रडलं? पाहा Viral Video

Ira Khan Nupur Shikhare wedding : आमिर खानच्या लेकिनं उदयपूर येथे एका सुरेख अशा सोहळ्यामध्ये ख्रिस्त धर्म पद्धतीनंही सहजीवनाची शपथ घेत नुपूरवर असणारं प्रेम व्यक्त केलं. हे क्षण आमिरच्या डोळ्यातही पाणी आणून गेले.   

सायली पाटील | Updated: Jan 11, 2024, 09:18 AM IST
आयरा- नुपूर आणि 'ती'; आमिरच्या लेकीच्या लग्नात कोण हसलं, कोण रडलं? पाहा Viral Video  title=
Ira Khan Nupur Shikhare christian wedding and Mithila Palkars birthday celebration latest update news

Ira Khan Nupur Shikhare wedding : मुंबईत 3 जानेवारीला नोंदणी पद्धतीनं विवाहबंधना अडकल्यानंतर आता (Aamir Khan) आमिर खानची लेक आयरा खान आणि सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे यांनी उदयपूर येते अतिशय साग्रसंगीत विवाहसोहळ्यात ख्रिस्त धर्म पद्धतीनं सहजीवनाच्या शपथा घेतल्या. संगीत, मेहंदी आणि त्यानंतर विवाहसोहळा अशा लांबलचक कार्यक्रमाच्या निमित्तानं नुपूर आणि आयरा या दोघांच्याही मित्रपरिवार आणि कुटुंबीयांनी उदयपूरमध्ये हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. 

7 जानेवारीपासून आयरा आणि नुपूरच्या लग्नसोहळ्यातील कार्यक्रमांना सुरुवात झाली. यामध्ये आमिर खान, त्याची एक्स वाईफ रिना दत्ता, किरण राव आणि मुलगा आझादही मोठ्या उत्साहात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. आमिरनं लेकिसाठी संगीत सोहळ्यामध्ये गाणंही सादर केलं. 10 जानेवारीला या जोडीनं सहजीवनाची शपथ घेत अनोख्या पद्धतीनं लग्न साजरा केलं. यावेळी आयरानं पांढरा शुभ्र गाऊन घातला होता. तर, मोत्यासमान दिसणाऱ्या फुलांची हेअरस्टाईल केल्यामुळं तिचा लूक आणखी कमाल दिसत होता. नुपूरही सूटमध्ये रुबाबदार दिसत होता. 

हेसुद्धा वाचा : आपल्याच सिगारेटच्या व्यसनाने वैतागली प्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली, 'मी खूप स्मोकिंग...'

 

आयरा आणि नुपूरनं नात्याला दिलेली ही नवी ओळख आणि त्यांच्या नात्याची ही अनोखी सुरुवात पाहताना आमिर खानही भावूक झाला. त्यानं कसेबसे रोखलेले अश्रू अखेर घरंगळले आणि परफेक्शनिस्टची भावनिक बाजूही अनेकांनीच पाहिली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

खास मैत्रिणीचा वाढदिवस ... 

नुपूर आणि आयराच्या या लग्नसोहळ्यामध्ये एका खास व्यक्तीचीसुद्धा बरीच चर्चा झाली. ही चर्चा होती, या दोघांचीही खास मैत्रिण असणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्री (Mithila Palkar) मिथिला पालकरची. नुपूर- आयराच्या अनेक सेलिब्रेशन्समध्ये मिथिला बऱ्याचदा दिसली आहे. त्यांच्या लग्नासोहळ्यातील अनके कार्यक्रमांमध्येही तिचा उत्साह पाहण्याजोगा होता. अशा या खास मैत्रिणीचा वाढदिवसही असल्यामुळं या जोडीनं तिचा वाढदिवस इतक्या गोंधळातही न विसरता साजरा केला. केक कापत आणि मिथिलाला शुभेच्छा देत तिचा हा दिवस आणखी खास करण्यात आला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

दरम्यान, उदयपूरमधील या सेलिब्रेशननंतर नुपूर आणि आयरा मुंबईतील मित्रमंडळींसाठी एका खास पार्टीचं आयोजन करणार आहेत असं सांगितलं जात आहे. जिथं आमिर खानचे मित्र, आयराचे मित्र आणि कलाजगतातील अनेक सेलिब्रिटी मंडळींची हजेरी पाहायला मिळू शकते.