Ira Khan and Ex Boyfriend Mishaal Kirpalani : अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान कायम चर्चेत असते. कधी बोल्ड फोटो तर कधी बॉयफ्रेंडसोबत असलेलं नातं. पण आता आयरा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. आयराने नुकताच बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत साखरपुडा केला आहे. त्यांच्या साखपुड्यात अनेक सेलिब्रिटी उपस्थितीत होते. पण नुपूरची आयुष्यात एन्ट्री होण्यापूर्वी आयराने Breakup चा सामना केला. ज्यामुळे आयरा गंभीर आजाराने त्रस्त होती.
नुपूरच्या आधी आयराच्या आयुष्यात मिशाल किरपलानी महत्त्वाचं स्थान होतं. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. दोन वर्षांनंतर आयरा आणि मिशालने विभक्त होण्यचा निर्णय घेतला. पण या ब्रेकअपचा आयराच्या मनावरच नाहीतर आरोग्यवर देखील प्रचंड परिणाम झाला. ब्रेकअपनंतर आयराला गंभीर आजाराचा सामना करावा लागला.
आयराने काही वर्षांपूर्वी एक पोस्ट करत आजाराबद्दल लोकांना सांगितलं.
आयरा म्हणते. 'मला आता एंग्जायटी अटॅक येत आहेत. कधी-कधी मला फार भीती वाटते, मला रडायला देखील येत... पण असे ही दिवस असतात तेव्हा मी प्रचंड आनंदी असते. ण यापूर्वी कधीही मला एंग्जायटी अटॅक आलेले नव्हते.'
'पॅनिक विरुद्ध पॅनिक आणि एंग्जायटी विरुद्ध एंग्जायटी अटॅक यातील मोठा फरक आहे. एंग्जायटी अटॅक हृदयाचे ठोके वाढतात. श्वासाची गती वाढणे... चीड-चीड होते.. रडायला येत... सतत काही तरी भयंकर घडणार असं वाटत असतं....'
आयरा पुढे म्हणते, 'अशा परिस्थितीत मी स्वतःशीच बोलते. पण या काळात बॉयफ्रेंडशी बोलण्याने मला खूप मदत होत आहे. काही तास तरी मला रिलॅक्स वाटतं. या आजारातून मी बाहेर येण्याचा प्रयत्न केला आहे... ' असे आयराने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
नुपूरने दिली साथ
पण आशा परिस्थितीतही आयराची साथ नुपूरने सोडली नाही. नुपूरने आयराला लग्नासाठी विचारलं आणि अखेर नुपूर - आयरने त्यांच्या नात्याला नवीन नाव दिलं. शुक्रवारी दोघांनी साखरपुडा पार पडला.
या खास सोहळ्याला आयराचं संपूर्ण कुटुंबही उपस्थित होतं. वडील आमिर खान, आई रीना दत्ता (Reena Dutta), आजी, भाऊ आणि काकू व्यतिरिक्त, किरण राव (Kiran Rao) ने देखील साखरपुड्यात दिसली.
कोण आहे नूपुर शिखारे ?
नूपुर शिखारे आमिर खानचा फिटनेस कोच आहे. पिंकव्हिलाने दिलेल्या रिपोर्टनुसार लॉकडाऊनच्या काळात जेव्हा इराने स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा इरा आणि नूपुर यांच्यातील नातं फुललं. त्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा सर्वत्र पसरू लागली.