मला तुमचे तळवे चाटायचे आहेत; राम गोपाल वर्मांनी कोणाकडे आणि कशासाठी व्यक्त केली ही इच्छा?

Ram Gopal Varma Wants To Suck Rajamouli Toe: राम गोपाल वर्मा यांनी काही ट्वीट केले असून यामधून त्यांनी दाक्षिणात्य दिग्दर्शक रामौलींसंदर्भात व्यक्त केलेली एक इच्छा सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

Updated: Jan 25, 2023, 02:30 PM IST
मला तुमचे तळवे चाटायचे आहेत; राम गोपाल वर्मांनी कोणाकडे आणि कशासाठी व्यक्त केली ही इच्छा? title=
Ram Gopal Varma Wants To Suck Rajamouli Toe

RGV Wants To Suck Rajamouli Toe: दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) हे त्यांच्या वक्तव्यांमुळे आणि ट्वीट्समुळे कायमच चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या ट्वीटमुळे नव्या वादाला तोंड फुटतं किंवा त्यावरुन त्यांना ट्रोल केलं जात. मध्यंतरी राम गोपाल वर्मांनी अभिनेत्री अशू रेड्डीचे (Ashu Reddy) पाय चाटल्याच्या फोटोंनी एकच खळबळ उडवली होती. मात्र आता राम गोपाल वर्मांनी 'आरआरआर'चे (RRR) दिग्दर्शक एसएस राजमौलींचे (S. S. Rajamouli) तळवे चाटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राम गोपाल वर्षांनी काही ट्वीट केले आहेत. यामध्ये त्यांनी ही विचित्र मागणी केली आहे.

राम गोपाल वर्मांनी राजमौली आणि हॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमरॉन यांच्यामधील संवादाचा व्हिडीओ रिशेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही आरआरआर चित्रपटाबद्दल बोलताना दिसत आहे.  "तुम्हाला इथं चित्रपट बनवायचा असेल तर आपण बोलू शकतो - जेम्स कॅमरॉन यांनी एसएस राजमौलींनी सांगितलं. दोन्ही दिग्दर्सकांमध्ये झालेल्या प्रदिर्घ संवादाची ही व्हिडीओ क्लिप पाहा," अशा कॅप्शनसहीत हा व्हिडीओ आरआरआरच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला. 

हाच व्हिडीओ कोट करत राम गोपाल वर्मांनी, "दादासाहेब फाळकेंपासून आजपर्यंत भारतीय चित्रपटाच्या इतिहासामध्ये कोणीही अगदी एसएस राजमौलींसहीत कोणीही असा विचार केला नसेल की एक भारतीय दिग्दर्शकाला हा क्षण अनुभवता येईल," अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

अन्य एका ट्विटमध्ये त्यांनी, "राजमौली तुम्ही सर्व चित्रपट निर्मात्यांचे विक्रम मोडीत काढले. अगदी का आसिफ ज्यांनी मुघले आझम बनवला होता ते रमेश सिप्पी ज्यांनी शोले बनवला होता. अगदी आदित्य चोप्रा, करण जोहर आणि भन्साळींनाही मागे टाकलं आहे. यासाठी मला तुमचे तळवे चाटायचे आहेत," अशी विचित्र इच्छा व्यक्त केली आहे. 

राम गोपाल वर्मांची ही अजब इच्छा ऐकून अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. जाणून घ्या नेमकं काय म्हटलंय लोकांनी...

1)

2)

3)

4)

5)

6)

 

दरम्यान, एकीकडे राजमौलींवर कौतुकाच वर्षाव होत असतानाच दुसरीकडे 'आरआरआर'मधील नाटू नाटू गाण्याला बेस्ट ओरिजन साँगसाठी ऑस्कर्सच्या अंतिम सोहळ्यासाठी मंगळवारी (24 जानेवारी 2023 रोजी) नामांकन मिळालं आहे.