अनुष्काच्या आधी या Top Model ला डेट करत होता विराट; जाणून घ्या कोण आहे ही सौंदर्यवती

त्याचं खासगी आयुष्यही चर्चेचा विषय ठरत होतं

Updated: Nov 18, 2021, 03:23 PM IST
अनुष्काच्या आधी या Top Model ला डेट करत होता विराट; जाणून घ्या कोण आहे ही सौंदर्यवती  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली यानं आतापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम रचले. विराटची कारकिर्द जशी चर्चेत राहिली, त्याचप्रमाणे त्याचं खासगी आयुष्यही चर्चेचा विषय ठरत होतं. 

विराटनं बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्याशी लग्नगाठ बांधली. पण, त्याआधी तो एका टॉप मॉडेलला डेट करत होता. 

जिच्यासोबत विराट रिलेशनशिपमध्ये होता, त्या मॉडेलनं विराटच्या पत्नीलाही सौंदर्याच्या बाबतीत चांगलीच टक्कर दिली होती. 

अतिशय चर्चेत आलेली ही मॉडेल होती इसाबेल लिटे (Izabelle Leite). ब्राझिलियन मॉडेल इसाबेल लिटे आताही भल्याभल्या अभिनेत्रींना मागे टाकते. 

बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये तिनं भूमिका साकारल्या आहेत. 2012 मध्ये इसाबेलनं तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. 

आमिर खानच्या 'तलाश द आंसर लाइज विद इन' या चित्रपटातून ती झळकली होती.

विराट आणि इसाबेलनं 2012 ते 2014 दरम्यान एकमेकांना डेट केलं. त्यांच्या नात्यात आलेली जवळीक माध्यमांच्या नजरेतून चुकली नाही. 2013 पासूनच ही जोडी चर्चेचा विषय ठरु लागली होती. 
 
ब्रेकअपनंतर एका मुलाखतीदरम्यान तिनं विराटसोबतच्या नात्यावर वक्तव्य केलं होतं. 

बेहद सुंदर हैं इजाबेल

2 साल का रहा रिलेशनशिप

बाद में अनुष्का से की शादी

आपण विराटसोबत 2 वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो आणि परस्पर सामंजस्यानं हे नातं तुटलं होतं, असं ती म्हणाली होती. 

इसाबेल आणि विराटचा ब्रेकअप झाल्यानंतर अनुष्कासोबत त्याचं नातं सुरु झालं आणि या दोघांनीही पुढे जात लग्न करण्याचा निर्णय़ घेतला.