त्याच्या मिठीत मिळतो सपना चौधरीला 'सुकून' कोण आहे तो?

 सपना चौधरीने काही वेळापूर्वीच सोशल मीडियातून एक छोटासा ब्रेक जाहीर केला होता

Updated: Mar 27, 2022, 08:28 PM IST
त्याच्या मिठीत मिळतो सपना चौधरीला 'सुकून' कोण आहे तो? title=

मुंबई : बिग बॉस फेम आणि हरियाणवी डान्सर सपना चौधरीने काही वेळापूर्वीच सोशल मीडियातून एक छोटासा ब्रेक जाहीर केला होता. तेव्हा तिचे चाहते खूप निराश झाले होते आणि ती लवकर परत यावी म्हणून तिचे चाहते प्रार्थना करत होते.

चाहत्यांचा जोश पाहून सपना चौधरी पुन्हा सोशल मीडियावर परतली आणि चाहत्यांसाठी एकामागून एक फोटो, व्हिडिओ शेअर करत आहे. अलीकडेच 'हरयाणवी क्वीन'ने तिच्या ४.८ मिलियन इंस्टाग्राम फॉलोअर्ससोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिने सांगितलंय की, तिला कोणाच्या मिठीत आराम मिळतो.

सपना चौधरीने आपल्या डान्सने संपूर्ण देशाला वेड लावलं आहे. तिची प्रकृती अलीकडेच बिघडली होती. त्यानंतर तिने सोशल मीडियापासून ब्रेक घेतला होता. मात्र नुकतीच ती सोशल मीडियावर परतली असून पुन्हा एकदा तिने धुमाकूळ घातला आहे.

सपना चौधरीच्या एक्सपीरियंसने लूटली मेहफिल
अलीकडे, सपनाने एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने पिवळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केल्याचं दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या अनुभवापेक्षाही चाहत्यांचं लक्ष त्या व्हिडिओच्या कॅप्शनकडे लागलं आहे. ज्यामध्ये तिला कोणाच्या कुशीत आराम मिळतो हे ती सांगत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सपनाने सांगितलं कोणाच्या मिठीत मिळतो आराम 
व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहीलं की,
'ये मोहब्बत है जनाब कितनी भी
तकलीफ दे मगर सुकून भी 
उसी की बाहों में मिलता है।
तिचं हे कॅप्शन सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.