सलग दुसऱ्या आठवड्यात 'छिछोरे'ची विक्रमी कमाई

चित्रपटाचं शूटिंग एका इंजिनियरिंगच्या कॉलेजमध्ये करण्यात आलं आहे.

Updated: Sep 13, 2019, 05:25 PM IST
सलग दुसऱ्या आठवड्यात 'छिछोरे'ची विक्रमी कमाई  title=

मुंबई : महाविद्यालयीन जीवनावर रेखाटण्यात आलेला 'छिछोरे' चित्रपटाच्या कमाईचा आकडा वाढत आहे. 'छिछोरे' चित्रपट सलग चढत्या क्रमावर आहे. कॉलेजच्या आठवणींमध्ये रमण्यास भाग पाडणारा हा चित्रपट चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे. सात दिवसांमध्ये चित्रपटाने ६८.८३ कोटींचा गल्ला जमा केला आहे. 

ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे आकडे शेअर केले आहेत. परदेशात सुद्धा हा चित्रपट चाहत्यांची मने जिंकताना दिसत आहे. 'ड्रीम गर्ल' आणि 'सेक्शन ३७५' चित्रपट देखील आज प्रदर्शित झाले आहेत. तर येत्या काळात हे चित्रपट एकमेकांना टक्कर देताना दिसणार आहे. 

चित्रपटाचं शूटिंग एका इंजिनियरिंगच्या कॉलेजमध्ये करण्यात आलं आहे. सुशांत, श्रद्धाने प्रमुख भूमिका साकारली असून प्रतीक बब्बर सुशांतच्या मित्राची भूमिका साकारत आहे. 'छिछोरे'चं दिग्ददर्शन 'दंगल' चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी केलं आहे. तर चित्रपटाची निर्मिती फॉक्स स्टार स्टूडियोज आणि साजिद नाडियावाला यांनी केली आहे.