एकमेकांपासून दूर झाल्यानंतर Imran Khan ची पत्नी दिसली 'या' Mystery Man सोबत!

बॉलिवूड अभिनेता इम्रान खानच्या पत्नीनं केले Mystery Man सोबत फोटो शेअर... फोटो पाहून नेटकऱ्यांना आली इम्रान खानची आठवण

Updated: Jan 7, 2023, 06:27 PM IST
एकमेकांपासून दूर झाल्यानंतर Imran Khan ची पत्नी दिसली 'या' Mystery Man सोबत! title=

Imran Khan Wife Avantika Malik With Mystery Man : बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा (Aamir Khan) भाचा इम्रान खान (Imran Khan) आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक (Avantika Malik) विभक्त होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अवंतिकानं विभक्त झाल्यानंतर सोशल मीडियावर एक मोटिव्हेशन्ल पोस्ट शेअर केली आहे. इम्रान आणि अवंतिकानं लग्नाच्या 8 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, अवंतिकानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवरून तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची एण्ट्री झाल्याचे दिसत आहे. अवंतिकानं एका मिस्ट्री मॅनसोबत हा फोटो शेअर केला आहे. 

अवंतिका मलिकनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून गेल्या वर्षीच्या काही खास आठवणींचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये इम्रान खान कोठेही दिसत नाही आहे. तर त्या दोघांच्या गोंडस मुलीचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोंमध्ये सगळ्यात शेवटी अवंतिकानं शेअर केलेल्या एका मिस्ट्री मॅनसोबतच्या फोटोनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहेत. यावेळी फक्त एकच फोटो नाही तर फोटोंचे कोलाज आहे. 

हेही वाचा : चार नातवंडांची आजी आहे 'ही' 70 वर्षांची सुपरमॉडेल, फिटनेस पाहून तरुणींनाही वाटेल लाज

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फोटोत दिसणारा मिस्ट्री मॅन आहे तरी कोण? (Avantika Malik With Mystery Man) 

अवंतिकानं शेअर केलेला हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे की हा मिस्ट्री मॅन कोण आहे. तर अवंतिकासोबत दिसणारा हा मिस्ट्री मॅन अभिनेता साहिब सिंग लाम्बा आहे. कोलाज फोटोंमध्ये अवंतिकानं साहिब सिंग लाम्बाच्या खांद्यावर हात ठेवला आहे. तर त्यानंतर शेअर केलेल्या फोटोंमध्ये साहिब सिंग लाम्बानं अवंतिकाच्या खांद्यावर हात ठेवला आहे. साहिब हा एक तरुण अभिनेता आहे, जो अजूनही करिअरमध्ये स्ट्रगल करत आहे. दरम्यान, अवंतिकाचे हे फोटो पाहिल्यानंतर ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी कमेंट करत इम्रान खानला मिस करत असल्याचे म्हटले आहे. 

कधी झाले होते अवंतिका आणि इम्रानचे लग्न (Imran Khan and Avantika Malik Marriage) 

अवंतिका आणि इम्रान हे 2011 मध्ये विवाह बंधनात अडकले होते. या जोडप्याला एक मुलगीही आहे. 2020 मध्ये अवंतिकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून तिच्या विभक्त झाल्याची माहिती दिली होती. त्यात अवंतिकाने लिहिले होते की 'लग्न अवघड आहे. घटस्फोट घेणे कठीण आहे. संवाद साधणे कठीण आहे. काही न करणेही अवघड आहे. जीवन कधीच सोपे नसते. पण आपल्याला कोणते कठीण जीवन निवडायचे आहे हे आपण ठरवू शकतो', असं अवंतिकानं कॅप्शन दिले