लग्नाआधीच इलियाना डिक्रूज प्रेग्नंट; बाळाचे वडिल कोण? चाहत्यांचा अभिनेत्रीला प्रश्न

Ileana D’Cruz Pregnant: अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर करताच ती सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे. ही गुडन्यूज सोशल मीडियावर शेअर करताच अभिनेत्रीवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

Updated: Apr 18, 2023, 04:53 PM IST
लग्नाआधीच इलियाना डिक्रूज प्रेग्नंट; बाळाचे वडिल कोण? चाहत्यांचा अभिनेत्रीला प्रश्न title=

Ileana D’Cruz Pregnant​: सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे आणि सेलिब्रिटी सगळ्यात जास्त सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. अभिनेत्री इलियाना डिक्रूज (Ileana D'Cruz) एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर इलियाना खूप सक्रिय असते. नेहमीच अभिनेत्री सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री सोशल मीडियावर स्वत:चे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. नुकतीच अभिनेत्री इलियानाने सोशल मीडियाव्दारे तिच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज शेअर केली आहे. लवकरच अभिनेत्री आई बनणार असल्याचं अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत सांगितलं आहे. 

अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर करताच ती सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे. ही गुडन्यूज सोशल मीडियावर शेअर करताच अभिनेत्रीवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. इलियानाने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. हे दोन्ही फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाईट आहे. त्यातल्या एका फोटोत बाळाचे कपडे दिसत आहेत. त्यावर 'एडवेंचर सुरु झालं आहे.' असं लिहीलं आहे. तर दुसऱ्या फोटोत इलियानाने एक नेकपीस घातला आहे. ज्यावर 'मम्मा' असं लिहीलं आहे. इलियानाचे चाहते ही गुडन्यूज ऐकून खूप खुश आहेत. 

अभिनेत्रीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ही गुडन्यूज देताच अभिनेत्रीला चाहते बाळाचं नाव विचारत आहेत. काही दिवसांपासून इलियाना ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर एंड्रयू नीबोनला डेट करत होती.  मात्र त्यांचं हे नात फार काळ टिकू शकलं नाही. या दोघांच्या ब्रेकअपनंतर तिच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता. यानंतर तिचं नावं कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियनसोबत जोडलं जाऊ लागलं. अभिनेत्रीला कतरिनाच्य फॅमेलीसोबत अनेकदा स्पॉट केलं गेलं.

अवघ्या काही वेळातचं अभनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होवू लागली आहे. सोशल मीडियावर अभनेत्रीच्या या पोस्टवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. सर्व सामांन्यापासून ते सेलिब्रेटींपर्यंत बऱ्याच जणांनी अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मैं तेरा हीरो, रुस्तम, बर्फी, फाटा पोस्टर निखला हीरो, बादशाहो, पागलपंती आणि रेड यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये इलियाना डिक्रूज झळकली आहे. बॉलिवूडसोबतच इलियानेने साऊथ इंडस्ट्रीतही स्व:तचं वेगळं स्थान मिळवलं आहे.