मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यापासून रोज नव-नवीन खुलासे समोर येत आहेत. आता पॉर्नोग्राफीमुळे राज कुंद्राला होणाऱ्या कमाईचा आकडा समोर आला आहे. सोबतचं झी मीडियाच्या हाती एक पावर पॉइन्ट प्रेजेंटेशन आलं आहे. ज्यामध्ये राज कुंद्राला तीन वर्षांपर्यंत होणाऱ्या कमाईच्या आकड्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जर सर्वकाही योजनेनुसार सुरू असतं तर तीन वर्षांत राज कुंद्राचा ग्रॉस रेव्हेन्यू 146 कोटी रूपये असता.
मुंबई क्राईम ब्रांचकडे असलेल्या पावर पॉइन्ट प्रेजेंटेशननुसार, पुढच्या तीन वर्षांत ( 2021-22, 2022-23, 2023-24) प्लॅन बी म्हणजे BollyFame नावाच्या ऍपच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईचा अंजाज बांधण्यात आला आहे. 2021-22 या वर्षात BollyFame ऍपच्या माध्यमातून राजची कमाई 36,50,00,000 रूपये ग्रॉस कमाई तर, नेट प्रॉफिटचा आकडा 4,76,85000 असता.
बातमी : http://पॉर्नोग्राफीचा खुलासा होताचं स्वतःला वाचण्यासाठी राज कुंद्राकडून मोठा निर्णय, पण....
2022-23 वर्षाचा ग्रॉस रेव्हेन्यू 7,3,00,00,000 रूपये करण्याचा टार्गेट होता, तर नेट प्रॉफिटचा आकडा 4,76,85,000 असता. त्यातप्रमाणे 2023-24 मध्ये राज कुंद्राच्या कमाईत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असती. क्राईम ब्रांचच्या सूत्रांकडून सापडलेल्या कागदपत्रांमध्ये 2 पानांचा समावेश आहे.