'नवाब' बनण्यात काही रस नाही, 'कबाब' खाण्यात आहे - सैफ अली खान

अभिनेता अरबाज खानचा 'पिंच' शो चांगलाच गाजत आहे.

Updated: May 14, 2019, 09:07 PM IST
'नवाब' बनण्यात काही रस नाही, 'कबाब' खाण्यात आहे - सैफ अली खान title=

मुंबई : अभिनेता अरबाज खानचा 'पिंच' शो चांगलाच गाजत आहे. यावेळेस त्याच्या शोमध्ये अभिनेता सैफ अली खानने हजेरी लावली आहे. या शो दरम्यान सैफने एका ट्रोलरला चांगलेच प्रत्युत्तर दिले. नेटकऱ्याने सैफला 'नवाब' असल्याबद्दल प्रश्न विचारला होता, तेव्हा त्याने 'नवाब' होण्याआधी मला 'कबाब' खायला आवडेल असे उत्तर दिले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happy to share the teaser of this season’s final Pinch. We have with us the suave and classy...Saif Ali Khan! Find out why he is so ‘Digitally Unavailable’ or is he reallyQuPlayTv quickheal_technologies venkyschicken @panchshil_realty hootmumbai ZEE5 #QuPlayTV #Pinch

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial) on

एपिसोडच्या प्रोमोमध्ये अरबाज सैफला एक टिप्पणी दाखवत आहे, 'नवाब बनने के साथ ही अभी भी सड़े हुए हुकुमत पर चिपका पड़ा है'. असे म्हणत नेटकऱ्याकडून सैफला ट्रोलकरण्यात आले. त्यांनंतर सैफ म्हणाला की, 'मला नवाब म्हणून मिरवण्यात काही रस नाही, मला कबाब खाण्यात रस आहे.'

सध्या सैफ त्याच्या बहुचर्चित 'सेक्रेड गेम्स' वेब सीरिजमध्ये व्यस्त आहे.