''मी एक दिवस कपडे घालणारच नाही'', काय आहेत उर्फी जावेदची नवीन नाटकं?

कधी आपल्या बॉयफेंड्सवर उर्फी उघडपणे बोलते तर आपल्या कपड्यांवरून. 

Updated: Jul 14, 2022, 10:43 PM IST
''मी एक दिवस कपडे घालणारच नाही'', काय आहेत उर्फी जावेदची नवीन नाटकं? title=

मुंबईः सध्या घराघरात एकच नाव फेमस आहे ते म्हणजे उर्फी जावेद. सतत सोशल मीडियावर कुठल्या ना कुठल्या तरी लुकमध्ये ती दिसते आणि सगळ्यांना हैराण करून सोडते. सगळेच तिच्या अतरंगी स्टाईलींगवर हसतात आणि तिची खिल्ली उडवतात पण तिची मात्र चांगलीच प्रसिद्धी होताना दिसते आहे. 

कधी आपल्या बॉयफेंड्सवर उर्फी उघडपणे बोलते तर आपल्या कपड्यांवरून. अजूनही तिचा फॅशन डिझायनर कोण हे तिने रिविलही केले नाही, तरी दरवेळेला एक नवा हटके लुक देत ती सगळ्यांना आश्चर्यचकित करत असते. आपल्या बिनधास्त आणि बेधडक स्वाभावामुळे उर्फी चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. तिच्या चाहत्यांचा वर्गही फार मोठा असून हल्ली तर ती मीडिया सेन्सेशन झाली आहे. 

बीग बॉस ओटीटीमुळे उर्फीला चांगलीच ओळख मिळाली. तिच्यावर टीका करणारेही पुष्कळ लोकं आहे पण तरीही तिला फार काळजीही नसते. उर्फी कोणीही हिरोईन नाही की कोणी नाही पण तिची दहशत मात्र सोशल मीडियावर असून ती सध्याची ट्रेडिंग स्टार आहे. उर्फी जावेद घरातून बाहेर पडताच पापाराझींनी तिला घेरले आणि नेहमीप्रमाणे विचित्र प्रश्नोत्तरांची सरबत्ती सुरू केली. बुधवारीही असाच प्रकार घडला. मुंबईच्या पावसात भिजलेली उर्फी घराबाहेर पडली. पापाराझी संधी कुठे सोडतात? उर्फी दिसू लागल्यावर त्यांनी तिच्याभोवती गराडा घातला. 

पापाराझींसोबत उर्फीने गप्पा मारल्या आणि विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना उर्फी म्हणाली की, एक दिवस मी कपडे घालणार नाही. मला वाटत नाही की मी माझ्या चाहत्यांना सरप्राईझ करण्याची फार गरज आहे. मला जे आवडते ते मी घालते. उर्फीच्या या विधानानंतर सर्वत्र उर्फीची चर्चा सुरूच झाली आहे. तिने घातलेल्या सुंदर निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये उर्फीला पाहून चाहते फिदा झाले.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आपण आता कपडे घालून फिरणार नाही या विधानावरून उर्फी चांगलीच ट्रोल झाली आहे त्यामुळे आता तिच्यावर सोशल मीडिया कमेंट्सचा पाऊस पडतो आहे.