या अभिनेत्याला मरणापूर्वी एकदा पाकिस्तानमध्ये जायचयं ....

  नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू असताना आता त्यामध्ये अभिनेते ऋषी कपूर यांनीदेखील उडी घेतली आहे.

Updated: Nov 12, 2017, 01:33 PM IST
या अभिनेत्याला मरणापूर्वी एकदा पाकिस्तानमध्ये जायचयं ....  title=

 मुंबई :  नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू असताना आता त्यामध्ये अभिनेते ऋषी कपूर यांनीदेखील उडी घेतली आहे.

 ऋषी कपूर यांच्या ट्विटमुळे हा वाद अधिक पेटला आहे. 

 

 'जम्मू-काश्मीर आपला, तर पाकव्याप्त काश्मीर त्यांचा आहे. हाच या समस्येवरील एकमेव उपाय आहे. मी ६५ वर्षांचा असून मरण्यापूर्वी मला पाकिस्तान पाहायचा आहे,' असे ट्विट ऋषी कपूर यांनी केले आहे. 

 काय म्हणाले होते फारूख अब्दूला ? 
   पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा आहे. तो कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही, असे वक्तव्य काश्मिरचे मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी केले होते. काश्मीर भारताकडे आहे.  युद्ध झाले तरी ही परिस्थिती बदलणार नाही असे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. 

 सिनेकलाकार ऋषी कपूर यांनीदेखील फारूक अब्दुलांना पाठिंबा दिला आहे.  फारुख अब्दुल्ला यांच्या वक्तव्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. जम्मू-काश्मीर आपला असून पाकव्याप्त काश्मीर त्यांचाच आहे. ही समस्या सोडवण्याचा हाच एकमेव उपाय आहे.  असे ऋषी कपूर म्हणाले. 

  माझ्या मुलांनीही त्यांचे मूळ कुठे आहे ते पाहावे अशी माझी इच्छा आहे, असे  ऋषी कपूर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.