Jaya Bachchan on Aishwarya Rai : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात सगळं ठीक नाही अशी चर्चा रंगली होती. त्याचं कारण म्हणजे अंबानींचा कार्यक्रम असो किंवा दुसरीकडे ऐश्वर्या ही एकटी लेक आराध्यासोबत स्पॉट झाली. त्या दोघी बच्चन कुटुंबासोबत एकत्र दिसल्या नाही. अनंत आणि राधिकाच्या लग्नानंतर त्यांच्या चर्चा काही जास्तच रंगल्या. त्यात आता जया बच्चन यांचा एक जूना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात जया बच्चन या ऐश्वर्यातील काही गुणांविषयी सांगताना दिसत आहेत. पण त्यावेळी त्यांनी असं काही सांगितलं की ज्यामुळे आता त्या ट्रोल होत आहेत.
सध्या इन्स्टाग्रामवर जया बच्चन यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहेत ज्यात करण जोहरशी त्या बोलताना दिसत आहेत. यावेळी जया बोलतात की "ती स्वत: खूप मोठी स्टार आहे, पण जेव्हा आम्ही सगळे एकत्र असतो तेव्हा मी कधीच पाहिलं नाही की ती स्वत: ला पूश करते, मला तिच्यातील हा गुण खूप आवडतो की ती स्वत: मागे उभी राहते, ती शांत राहते, ती ऐकते. सगळ्यात महत्त्वाची गोष्टी म्हणजे ती या सगळ्यात छान फीट झाली आहे. फक्त कुटुंबात नाही तर तिला माहित आहे की हे कुटुंब आहे आणि ते चांगले मित्र आहेत. मला वाटतं की सगळ्यांनी असचं असायला हवं."
खरंतर या व्हिडीओवर लोक कमेंट करत जया यांना ट्रोल करताना दिसत आहेत. एक नेटकरी म्हणाला, टॉस्किस सासू, मागे उभं राहण्याविषयी बोलते... गप्प बस. दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली की स्वत: च्या मुलीसोबत देखील असंच शिकवशील का? तिसरा नेटकरी म्हणाला, बॅंक बॅलेन्स वेगळा असला तरी आमच्या सासूसारखीत सासू आहे. आणखी एक नेटकरी म्हणाला, तुमच्या मुलीला देखील सांगा मागे उभं रहायला. दुसरा नेटकरी म्हणाला, गप्प राहिली की चांगली आणि स्वत:चं स्टॅन्ड घेतलं की वाईट.
दरम्यान, या सगळ्यात अभिषेक बच्चन देखील चर्चेत आहे. कारण नुकतीच त्यानं अशी एक पोस्ट लाइक केली ज्यात घटस्फोटाविषयी लिहिलं होतं. ज्यानंतर अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाची चर्चा रंगली. मात्र, काही काळानंतर अभिषेकनं त्या पोस्टवरचं लाइक काढून टाकलं.