Devara X Review : फर्स्ट डे, फर्स्ट शो, 'देवरा' चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड गर्दी, प्रेक्षकांनी सांगितला चित्रपटाचा थरार!

जूनियर एनटीआरचा 'देवरा' चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चाहते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. कसा आहे चित्रपट? जाणून घ्या सविस्तर

सोनेश्वर पाटील | Updated: Sep 27, 2024, 07:31 PM IST
Devara X Review : फर्स्ट डे, फर्स्ट शो, 'देवरा' चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड गर्दी, प्रेक्षकांनी सांगितला चित्रपटाचा थरार! title=

Devara X Review : जूनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खान यांचा 'देवरा' चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.  पहाटे पासूनच जूनियर एनटीआरचा 'देवरा' चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये चाहत्यांची गर्दी दिसून येत आहे. यासोबतच 'देवरा' चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. 

'देवरा' चित्रपट पाहिल्यानंतर जूनियर एनटीआरच्या अभिनयाचे ट्विटरवर चाहते कौतुक करत आहेत. चित्रपटाला ब्लॉकबस्टर देखील म्हटलं जात आहे. 

एका चाहत्याने म्हटलं आहे की, 'देवरा' चित्रपटातील अॅक्शन सीन मला खूप आवडले आहेत. या चित्रपटात जूनियर एनटीआरने जबरदस्त अभिनय केला आहे. हा चित्रपट पाहण्यासारखा आहे. 

तर दुसऱ्या चाहत्याने म्हटलं आहे की, 'देवरा' चित्रपटाच्या कथेची सुरुवात चांगली आहे. जूनियर एनटीआरच्या एन्ट्रीचा सीन खूपच खास आहे. तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिले आहे की, मी या चित्रपटाला अडीच स्टार दिले आहेत. कारण पहिला भाग सरासरी आहे. तर दुसरा भाग त्यापेक्षा थोडा कमी आहे. चित्रपटातील VFX निराशाजनक आहेत. पण जूनियर एनटीआरने चित्रपट वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.

'देवरा' चित्रपटातील कलाकार

'देवरा' चित्रपटात जूनियर एनटीआर, जान्हवी कपूर, सैफ अली खान, प्रकाश राज, श्रुती मराठे, शाइन टॉम चाको, कलाई अरसन आणि नारायण मुख्य भूमिकेत आहेत. 'देवरा' चित्रपटाचे बजेट हे 300 कोटी रुपये आहे. मात्र, या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच प्री-सेल्स आणि अॅडव्हान्स बुकिंगमधून जगभरात 180 कोटी रुपयांची कमाई केली असल्याचं बोलले जात आहे. 'देवरा' चित्रपट आज प्रदर्शित झाल्यानंतर देखील पहिल्याच दिवशी हा चित्रपट 100 कोटींची कमाई करेल असं म्हटलं जात आहे. सध्या हा चित्रपट पाहण्यासाठी देखील चाहते थिएटरमध्ये प्रचंड गर्दी करत आहेत.