'बरं झालं तिचं वजन वाढलं...', सेलिब्रिटी पार्टीमधील गॉसिप ऐकून Hruta Durgule ला बसला धक्का

Hruta Durgule :  हृता दुर्गुळेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सेलिब्रिटी पार्ट्यांमध्ये तिच्याविषयी कशा किंवा कोणत्याही एखाद्या व्यक्तीविषयी कशा कमेंट केल्या जातात ते सांगितलं. तिच्याविषयी केलेल्या कमेंट ऐकल्यानंतर हृताला मोठा धक्का बसला होता. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 14, 2023, 05:18 PM IST
'बरं झालं तिचं वजन वाढलं...', सेलिब्रिटी पार्टीमधील गॉसिप ऐकून Hruta Durgule ला बसला धक्का  title=
(Photo Credit : Hruta Durgule Instagram)

Hruta Durgule : छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत सगळ्याच प्रेक्षकांचं मन जिंकणारी लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळ (Hruta Durgule) आहे. हृता दुर्गुळ सध्या तिच्या सर्किट या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, हृताला इथ पर्यंत पोहोचण्यासाठी तिनं खूप मेहनत घेतली. तिला आजही हृताला अनेक गोष्टी सुनावण्यात जातात. तर हृतानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. 

हृतानं सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी हृतानं पार्टीदरम्यान, तिच्यावर कशा प्रकारे कमेंट करण्यात आल्या त्याविषयी तिनं सांगितलं. 'अलिकडेच घडलेला एक प्रसंग आहे. मध्यंतरी माझं वजन वाढलं होतं, त्यावरून एका पार्टीमध्ये कोणीतरी माझ्या वजनाबाबत भाष्य केलं होतं. ती व्यक्ती पार्टीत म्हणाली, बरं झालं हृताचं वजन वाढत आहे. मग आता तिला कामं तरी मिळणार नाहीत. निदान तिची कामं आम्हाला मिळतील. मी त्यावेळी या पार्टीमध्ये नव्हते. मला माझ्या एका जवळच्या व्यक्तीने याबाबत सांगितलं. दुसरीकडे मी माझं वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेत होते.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे हृता म्हणाली, 'अशा अनेक गोष्टींचा मी सामना केला आहे. पण माझ्याविषयी केलेली ही कमेंट ऐकून मला वाटलं की आपल्याविषयी लोक असं कसं बोलू शकतात? स्पर्धा ही सगळीकडेच असते. पुढे जाणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचा पाय खेचणं हे चुकीचं आहे. कामासाठी असं काही करण्याची गरज मला वाटत नाही. जे आहे ते मी तोंडावर बोलते. मला समोर किंवा उघडपणे बोलण्याची भीती वाटत नाही. कारण माझं काम खरं आहे. माझं काम बोलतं.' 

हृतानं प्रसिद्ध दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत लग्न केलं आहे. तर प्रतीक हा लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. मुग्धा यांनी अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.

हेही वाचा : Ajay Devgn च्या मुलीचे नाव न्यासा नाही तर...

मुग्धा यांनी ‘बे दुणे साडे चार’, ‘मिस मॅच’, ‘कर्तव्य’, ‘माहेर माझं हे पंढरपूर', अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. प्रतीक शाह हे नाव छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध नाव आहे. प्रतीकने ‘बेहद 2’, ‘एक दिवाना था’ आणि ‘तेरी मेरी एक जिंदणी’ यासारख्या लोकप्रिय मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. दरम्यान, हृता सासू आणि नवरा प्रतीकसोबत सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर करताना दिसते. तर तिचे लाखो चाहते आहेत.