बॉयफ्रेंडच्या मिठीत दिसली हृतिकची पहिली पत्नी, कमेंट त्याने लिहिलं...

घटस्फोटानंतर हृतिकची पहिली पत्नी बॉयफ्रेंडच्या मिठीत... पाहा फोटो    

Updated: May 17, 2022, 10:42 AM IST
बॉयफ्रेंडच्या मिठीत दिसली हृतिकची पहिली पत्नी, कमेंट त्याने लिहिलं...

 मुंबई : अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान जेव्हा विभक्त झाले, तेव्हा त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. आज सुझान आणि हृतिक वेगळे राहत असले तरी ते दोघे मुलांचं योग्य पद्धतीने सांभाळ करतात. सुझान आणि हृतिक मुलांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी परदेशात जातात. पण17 वर्षांचं नातं संपवत दोघांनी घटस्फोट घेण्याचा टोकाचा निर्णय घेतला. हृतिकनंतर सुझान खानच्या आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. सुझानच्या मनावर राज्य करणाऱ्या त्या व्यक्तीचं नाव अर्सलान गोनी (Arslan Goni) आहे. 

अर्सलान आणि सुझान गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असातात. घटस्फोटानंतर सुझान बॉयफ्रेंड अर्सलानच्या मिठीत दिसली. 

खुद्द सुझानने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यमध्ये ती बॉयफ्रेंड अर्सनालसोबत दिसत आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, 'अनेकदा बिच खास जागा असू शकत नाही..., काही वेळी भावना देखील खास असू शकतात...' असं लिहिलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सुझानच्या पोस्टवर अर्सनालने इमोजी कमेंट केले आहेत. सध्या सुझानची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, हृतिकसोबत घटस्फोट झाल्यानंतर सुझानचं नाव अर्सलानसोबत जोडलं जावू लागलं. घटस्फोटानंतर दोघे अनेक दिवस सोशल मीडियापासून दूर होते. एवढंच नाही तर दोघे प्रचंड दुःखात होते.

यावेळी, दोघांना आपापल्या परीनं आधार देण्याचा प्रयत्न दोघांच्याही नातेवाईकांनी केला. दोघं एकमेकांपासून वेगळे राहून आनंदात राहणार नसतील तर दोघांनीही आपल्या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करावा, अशी दोघांच्याही नातेवाईकांची आणि चाहत्यांचीही इच्छा होती.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x