'हवेत अॅक्शन ते किसिंग सीन', 'फायटर' मधील हृतिक आणि दीपिकाची केमिस्ट्री तुम्ही पाहिलीत का?

Hrithik Roshan and Deepika Romantic : हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या 'फायटर' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील हृतिक आणि दीपिकाची केमिस्ट्री चर्चेत...

दिक्षा पाटील | Updated: Dec 8, 2023, 05:30 PM IST
'हवेत अॅक्शन ते किसिंग सीन', 'फायटर' मधील हृतिक आणि दीपिकाची केमिस्ट्री तुम्ही पाहिलीत का? title=
(Photo Credit : Social Media)

Hrithik Roshan and Deepika Romantic : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या 'फायटर' या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील त्यांचा लूक प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरता आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये हृतिक आणि दीपिकाची केमिस्ट्री पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले असून ही केमिस्ट्री पसंतीत उतरली आहे. या चित्रपटासाठी तर प्रेक्षक चांगलेच आतुर आहेत.  दरम्यान, तुम्ही जर टीझर पाहिला असेल तर तुम्हाला त्यातील अनेक गोष्ट स्पष्ट दिसल्या नसतील. तर काही नेटकऱ्यांनी त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत हृतिक आणि दीपिकाचे काही फोटो शेअर केले आहेत. 

 'फायटर' या चित्रपटातून पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये फायटर जेट्स हवेक अॅक्शन करताना पाहायला मिळणार आहे. हे काही तरी असं आहे जे आज पर्यंत कोणी पाहिलेलं नाही. या टीझरला पाहताना नक्कीच तुमच्या अंगावर शहारे आले असणार. त्याचं आणखी एक कारण म्हणजे हृतिक, दीपिका आणि अनिल कपूर यांचा फायटर पायलट अवतार. पण त्यात स्पष्ट दिसली नाही ती म्हणजे हृतिक आणि दीपिकाची केमिस्ट्री. तेच चित्रपटात पाहण्यास प्रेक्षकांची आतुरता वाढली आहे. मात्र, या टीझरमधील काही सीन्सनं प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. 

हेही वाचा : प्रसाद खांडेकरसोबतच्या कथित वादावर उघडपणे बोलले भाऊ कदम; म्हणाले- 'आम्ही प्रतिस्पर्धी...'

चित्रपटाच्या टीझरमध्ये हृतिक जिथे फायटर प्लेन उडवतोय तिथे दुसरीकडे दीपिका डोंगरांमध्ये हेलिकॉप्टर पूर्ण स्किल्समध्ये उडवतं त्याचं कंट्रोल सांभाळताना दिसत आहे. पण या दोघांची केमिस्ट्री ही फक्त हवेत नाही तर तुम्हाला अशीही पाहायला मिळणार आहे. त्या दोघांची एक फ्रेम असून त्यात हृतिक आणि दीपिका कोणत्या पार्टीत असल्याचे किंवा त्या सिच्युएशनमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय ते दोघं बीचवर देखील दिसत आहेत. त्यावेळी दीपिकानं मोनोकिनी परिधान केली आहे. तर ते दोघं किस करणार आहेत असे दृश्य पाहायला मिळाले. तर कधी ते दोघं युनिफॉर्ममध्ये पाहायला मिळत आहे. तर कधी बाईकवर फिरताना दिसत आहे. त्या दोघांना बाईकवर जाताना पाहून तुम्हाला क्लासिक हॉलिवूड एरिअल अॅक्शन चित्रपट 'टॉप गन'ची नक्कीच आठवण येईल.

दरम्यान, हृतिक रोशन आणि दीपिकाचा हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणशिवाय अनिल कपूर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे त्यांना अॅक्न करताना पाहण्यासाठी सगळ्यांची प्रतिक्षा शिगेला पोहोचली आहे.