कोरोनाच्या काळात सैफमध्ये झाले महत्वाचे बदल

सैफमध्ये सर्वात मोठा बदल 

Updated: Aug 17, 2020, 03:46 PM IST
कोरोनाच्या काळात सैफमध्ये झाले महत्वाचे बदल  title=

मुंबई : नुकताच अभिनेता सैफ अली खानने ५० वा वाढदिवस साजरा केला. यावेळी करिश्मा कपूर, सोहा अली खान, कुणाल खेमूसोबत वाढदिवस साजरा केला. सैफच्या वाढदिवसाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर झाले. तसेच करीनाची एक मुलाखत देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यामध्ये देखील तीने सैफ बद्दल खास गोष्टी सांगितल्या होत्या. 

सैफबद्दल बोलताना करीना म्हणाली की, सैफ असा माणूस नाही की जो फक्त यशाच्या मागे धावेल. तसेच तो गर्दीवर विश्वास ठेवणारा देखील नाही. करीनाने सैफ सिनेमांबाबत कसा आहे ते सांगितलं. पण यासोबतच कोरोनाच्या काळात सैफमध्ये किती बदल झाला हे देखील सांगितलं. 

करीना म्हणते की, कोरोनाच्या काळात सैफ अतिशय भावूक आणि अधिक संवेदनशील झाला आहे. तर करीना या काळात अधिक कठोर झाली आहे. सैफला या काळात आयसोलेट होण्यास काहीच हरकत नसल्याचं देखील करीना म्हणाली. 

कामाबद्दल बोलायचं झालं तर तिच्याकडे अनेक प्रोजेक्ट आहेत. करीना लाल सिंह चड्ढा ,सिनेमात काम करत आहेत. या सिनेमातून खूप दिवसानंतर आमिर खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. 

तसेच 'आम्हाला हे कळवण्यास अतिशय आनंद होत आहे की, आमच्या कुटुंबात आता एक नवी गोष्ट जोडली जाणार आहे. सर्वांनीच दिलेलं प्रेम आणि आधारासीठी आम्ही आभारी आहोत', असं या सेलिब्रिटी जोडीच्या कुटुंबाकडून म्हटलं गेलं. 

मुख्य म्हणजे इथे कुठेच बाळाचा किंवा गरोदरपणाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. किंबहुना सोशल मीडियावर असणाऱ्या करीनानंही अशी कोणतीही पोस्टही शेअर केलेली नाही. त्यामुळं याबाबतच खुद्द करिना काही अधिकृत माहिती देते का, याकडेच सर्वांचं लक्ष आहे. त्याहूनही सैफिनाच्या कुटुंबात आलेली ही आनंदाची बातमी नेमकी आहे तरी काय, हे जाणून घेण्यासाठीसुद्धा अनेकजण उत्सुक आहेत.