The Nun सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

ब्रेक केले सर्व रेकॉर्ड 

The Nun सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन  title=

मुंबई : हॉलिवूड हॉरर सिनेमा 'द नन' इंडियन बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी म्हणजे ओपनिंग डे च्या दिवशी 8 करोड रुपयांची कमाई केली आहे. भारतात हॉलिवूड सिनेमाने आतापर्यंत अशी कमाई केलेली नाही. तसेच आता देखील हा सिनेमा चांगली कमाई करत आहे. बॉलिवूड ट्रेड ऍनालिस्ट तरण आदर्शने आपल्या ट्विटमध्ये सांगितलं आहे की, 'द नन' या सिनेमाने आपल्या विकेंडला भारतात एकूण 28.50 करोड रुपयांची कमाई केली आहे. 

शुक्रवारी "द नन' या सिनेमासोबत बॉलिवूडमधील तीन सिनेमे प्रदर्शित झाले. ते म्हणजे 'पलटन', 'लैला मजनू', 'गली गुलिया' हे ते तीन सिनेमे. हे तिन्ही सिनेमे 'द नन' समोर काहीच चालले नाहीत. तसेच द नन हा सिनेमा 2 आठवड्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या राजकुमार रावच्या 'स्त्री' या सिनेमाला देखील कडक टक्कर देत आहे.

'द नन' या सिनेमाची वर्ल्ड वाइड कमाईबद्दल बोलायचा झालं तर हा सिनेमा सगळीकडे धूम करत आहे. फोर्ब्स वेबसाइटच्या रिपोर्टनुसार पहिल्या विकेंडमध्येच या सिनेमाने जगभरात 943.2 करोड रुपये कमाई केली आहे.या सिनेमाने पहिल्याच विकेंडमध्ये 784.8 करोड रुपये नफा मिळवला आहे.