मुंबई : सनी लिओनी मुख्य भूमिकेत असलेली 'अनामिका', या वेबसिरीजच्या सेटवर जोरदार राडा झाला आहे. या वेबसीरिजचं दिग्दर्शन विक्रम भट यांनी केलं आहे. रिपोर्ट्सनुसार शूटिंग दरम्यान काही गुंड सेटवर पोहोचून त्यांनी 29 लाखांची मागणी दिग्दर्शन विक्रम भट यांच्याकडे केली. हे प्रकरण अॅक्शन डायरेक्टर अब्बास अली मोघुल यांच्याशी व्यवहाराबद्दल असल्याचे सांगण्यात येत आहे.या घटनेनंतर विक्रम यांनी प्रथम सनी लिओनीला सुरक्षित ठिकाणी पाठवलं या सगळ्या राड्यात सनी लिओनी सुखरुप असल्याचं समजत आहे.
विक्रम भट्ट यांनी एका मुलाखतीत सांगितल आहे, मी अस्वस्थ होतो. मला काय करावे हे माहित नव्हते. माझ्याकडे जबरदस्तीने अब्बासला देणाऱ्या चेक्सचे स्नॅपशॉट्स मागण्यात आले. नंतर त्याच्या टीमकडून एका व्यक्तीने येऊन तपासणी केली. विक्रमनं सांगितले, तोपर्यंत सूर्यास्त झाला होता आणि मी ज्या सीनचे प्लानिंग केले होते ते शूट नाही करु शकलो.
जेव्हा ईटाइम्सने अब्बासशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते म्हणाले, मी आता काय बोलू? फायटर असोसिएशन या प्रकरणाचा शोध घेत आहे, आशा आहे ते हे प्रकरण सोडवतील. अब्बास यांच्या बोलण्यावर विक्रम यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ते कशाबद्दल बोलत आहेत? जर मी अब्बासचे 2 फोन घेऊ शकत नसतो तर तो माझ्याकडे दुसर्या मार्गाने पोहोचू शकत नव्हता? मला त्याला 29 लाख रुपये द्यायचे नाही आहेत.त्याने कोणताही करार किंवा करार केला नाही.
एका रिपोर्टनुसार, हे गुंड फायटर असोसिएशनचे होते. त्यांनी जबरदस्ती शूटिंगच्या ठिकाणी प्रवेश केला आणि विक्रम भट्ट यांच्याकडे 29 लाखांची मागणी केली. अॅक्शन डायरेक्टर-स्टंट कोऑर्डिनेटर अब्बास अली मोगल यांना कामाचे पैसे द्यावेत अशी मागणी देखील त्या गुंडांनी दिग्दर्शक विक्रम यांच्याकडे केली. अनामिकाच्या निमीत्ताने विक्रम भट्ट आणि सनी लिओनी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.या सगळ्या प्रकारानंतर विक्रम भट यांनी लोकेशन चेंज करावं लागलं.