Coco Lee Death : सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी आणि मुळची हाँगकाँगची गायिका कोको लीचं वयाच्या 48 व्या वर्षी निधन झालं. तिच्या बहिणींनी फेसबुक पोस्ट लिहित यासंदर्भातील माहिती दिली. गायिकेनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असतानाच काही काळानं तिचा मृत्यू ओढावल्याचं म्हटलं जात आहे.
अनेक माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार कोको ली गेल्या बऱ्याच काळापासून नैराश्याचा सामना करत होती. तिनं आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला ज्यानंतर तिला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. पण, तिथं तिचे प्राण वाटवण्यात डॉक्टरांना अपयश आलं. कोकोच्या निधनानंतर तिच्या बहिणी नॅन्सी आणि कॅरल यांनी या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं.
Hong Kong-born singer Coco Lee dies after suicide attempt
Read @ANI Story | https://t.co/7M7gUE4eMx #CocoLee #HongKong pic.twitter.com/B8qMH7EWLF
— ANI Digital (@ani_digital) July 6, 2023
कोको ली फक्त हाँगकाँगमध्येच नव्हे तर जगभरात प्रसिद्धीझोतात आली होती. इतकंच नव्हे तर, ही चीनमधील एक अशी Chinese गायिका होती जिला ऑस्करमध्ये आपली कला सादर करण्याची संधी मिळाली होती. मुळची Hong Kong ची रहिवासी असणाऱ्या कोकोचं बालपण सॅन फ्रांसिस्कोमध्ये गेलं होतं. तिथूनच तिनं एका कॉन्सर्टमध्ये सहभागी होत या क्षेत्रात नावारुपाय येण्यास सुरुवात केली होती.
जवळपास तीन दशकांहून अधिक काळापासून कोको लीनं तिच्या गाण्याच्या बळावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला. यादरम्यान तिनं इंग्रजी आणि कँटोनीज अशा अल्बममधून आपली कला सादर केल्याचं पाहायला मिळालं. सोनी म्युझिककडून करारबद्ध होणारी ती चीनमधील पहिलीच गायिका होती.
कोको ली नैराश्याचा सामना करत असून, मागील काही वर्षांमध्ये तिची अवस्था बिघडतच चाललेली असंही म्हटलं गेलं. थोडक्यात नैराश्याचा आणखी एक बळी. दैनंदिन जीवन जगत असताना काही अशा घटना आपल्या मनावर इतका परिणाम करून जातात की त्यांचा सामना करताना नकळत काही व्यक्ती परिस्थितीपुढे हतबल होतात आणि नैराश्याच्या सावलीत झाकोळून जातात. त्यामुळं नैराश्याची लक्षणं ओळखणंही गरजेचं.
काय आहेत नैराश्याची दुर्लक्षित लक्षणं?
- निद्रानाश किंवा झोपेच्या रचनेत बदल
- मद्य किंवा तत्सम पदार्थांचा आधार
- भूक न लागणं, वजन वाढणं किंवा कमी होणं
- स्वत:बद्दल सतत नकारात्मक बोलणं
- सतत मळमळणं
- अजिबातच आशावादी नसणं
- कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रीत न करता येणं