जयपूरमध्ये भावोजींचं जंगी स्वागत

भारत दौऱ्याला उत्तम प्रतिसाद 

Updated: Feb 10, 2020, 03:08 PM IST
जयपूरमध्ये भावोजींचं जंगी स्वागत title=

मुंबई  : 'झी मराठी’ वाहिनीवरील ‘होम मिनिस्टर’ आणि आदेश बांदेकर हे समीकरण झाले आहे, तर आदेशभावोजी हे अल्पावधीतच प्रत्येक मराठी कुटुंबातील सदस्य बनले आहेत. केवळ १३ भागांसाठी सुरु झालेल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी आदेश बांदेकर यांच्यावर देण्यात आली. आणि तेरा भागांसाठी सुरू झालेल्या ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाने आज सोळा वर्षांचा टप्पा पूर्ण केला. आता या लोकप्रिय कार्यक्रमाचा भारत दौरा सुरु आहे.

नुकतंच या दौऱ्या निमित्त आदेश बांदेकर यांनी जयपूरला भेट दिली. जयपूर मध्ये दाखल होताच जयपूरकरांनी 'पधारो म्हारे देश'म्हणत त्यांचा स्वागत केलं, सोबत राजस्थानी पगडी, जॅकेट, त्यांना भेट म्हणून दिली, वहिनींनी भाओजींच स्वागत राजस्थानी मिठाई देऊन केलं. राजस्थानी पगडीमधील आदेश बांदेकर यांची काही खास क्षणचित्रं त्यांच्या आणि होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या चाहत्यांसाठी.

या भारत दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेरील प्रेक्षकवर्ग खूप सुखावला आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आणि त्यांचं प्रेम आदेश बांदेकरांपर्यंत पोहचत आहे. दिल्ली, इंदूर, अहमदाबाद इकडे दौऱ्या केलेल्या भावोजींना चक्क हैदराबादवरुन देखील एका चाहत्यांचा पात्र आलं ज्यात त्याने झी मराठी या वाहिनीचे आभार मानले आहेत. झी मराठी सादर करत असलेले सगळेच कार्यक्रम आणि होम मिनिस्टरचा नुकताच सुरु झालेला भारत दौरा स्तुत्य असल्याचं त्यांनी या पात्रात सांगितलं आहे.

होम मिनिस्टरच्या भारत दौऱ्यामुळे हि वाहिनी महाराष्ट्राच्या बाहेरील मराठी समाजाला एकत्र आणतेय आणि त्यांच्याशी देखील नातं जोडतेय हे खरंच उल्लेखनीय आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. भारताच्या विविध जिल्ह्यातून आपल्याला इतकं प्रेम मिळतंय हे पाहून आदेश बांदेकर देखील भारावून गेले.