'अय्यारी' तरुणांसाठी बनतय राष्ट्र गीत

दिग्दर्शक नीरज पांडेचा सिनेमा असलेल्या 'अय्यारी' सगळीकडे चांगलाच चर्चेत आहे.  सध्या त्याच्या प्रमोशनल ट्रॅकची शुटींग पिल्लई कॉलेज परिसरात सुरू आहे. या गाण्यात ४ ते ५ हजार तरुणांना घेऊन 'युवा राष्ट्रगीत' चित्रित करण्यात येत आहे. 

Updated: Jan 4, 2018, 10:27 AM IST
'अय्यारी' तरुणांसाठी बनतय राष्ट्र गीत  title=

मुंबई : दिग्दर्शक नीरज पांडेचा सिनेमा असलेल्या 'अय्यारी' सगळीकडे चांगलाच चर्चेत आहे.  सध्या त्याच्या प्रमोशनल ट्रॅकची शुटींग पिल्लई कॉलेज परिसरात सुरू आहे. या गाण्यात ४ ते ५ हजार तरुणांना घेऊन 'युवा राष्ट्रगीत' चित्रित करण्यात येत आहे. 

या गाण्याचा व्हिडिओ बनवला जात असून मनोज लोबो याचे डिओपी तर फिरोज खान कोरिओग्राफर आहेत. 

२६ जानेवारीला रिलीज 

सिनेमातील हे गाणे अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री रकुल प्रीत यांच्यावर आधारीत आहे. नीरज पांडेने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

प्लान सी स्टुडिओज आमि जयंतीलाल गडा या सिनेमाचे निर्माते आहेत. २६ जानेवारी २०१८ ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.