अभिनेत्री हिना खानचा गंमतीशीर व्हिडिओ होतोय व्हायरल, आवरणार नाही हसू

अभिनेत्री हिना खान कायम आपल्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते.

Updated: Jul 2, 2021, 04:45 PM IST
अभिनेत्री हिना खानचा गंमतीशीर व्हिडिओ होतोय व्हायरल, आवरणार नाही हसू title=

मुंबई : टीव्ही अभिनेत्री हिना खान कायम आपल्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही शोच्या माध्यमातून यशाच्या पायर्‍या चढणारी हिना खान बिग बॉसमध्ये अगदी वेगळ्या स्टाईलमध्ये दिसली होती. सध्या हिनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे हिना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे

एक्सप्रेशन बघून आवराणार नाही हसू
यापूर्वी हिना खान एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती, या व्हिडिओनंतर हिना बरीच ज्यानंतर ती बरीच सक्सेसफुल देखील झाली होती. हिना खान सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते आणि चाहत्यांसाठी काहीतरी शेअर करत असते. अलीकडेच तिने स्वत:चा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये हिना खान प्राणायाम करताना दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कॅप्शनमध्ये हिनाने लिहिलं ही गोष्ट
प्राणायाम करताना ती खूप विचित्र एक्सप्रेशन देत ​​आहे जे एक्सप्रेशन तिच्या चुलतभावाने गुपचुप व्हिडिओमध्ये कॅप्चर केली आहे. हा व्हिडिओ शेअर करत हिनाने लिहिलंय की, ही माझ्या जीवनाची कहाणी आहे. योगा सेशन. रेकॉर्ड करुन एडिट आणि मिक्स करुन मननने मला हा व्हिडिओ पुन्हा पाठवला जेणेकरुन तो माझी थट्टा करेल. तू खूप वाईट आहेस मनु. मला शांततेत व्यायाम करायला देखील देत नाहीस.

बिग बॉस सीझन 14 मध्ये पाहिलं होतं
हिना खानच्या या व्हिडिओवर बऱ्याच चाहत्यांनी मजेदार कमेंन्ट केल्या आहेत. हिनाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, हिना खान यापूर्वी बिग बॉस सीझन 14 मध्ये दिसली होती. शोच्या पहिल्या काही भागांमध्ये तिला सीनियर कंटेस्टंट म्हणून आणलं गेलं होतं, त्यानंतर ती शोमधून बाहेर पडली.