मुंबई : गायक राहुल वैद्य बिग बॉस 14 मधील सगळ्यात दमदार स्पर्धकांपैकी एक होता. राहुलने केवळ टास्क आणि स्ट्रॅटेजीनुसार चांगली कामगिरी केली नाही तर आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही तो सतत चर्चेत असतो. बिग बॉसच्या घरात असताना राहुल वैद्यने गर्लफ्रेंन्ड दिशा परमारला लग्नासाठी प्रपोज केलं होतं.
टी-शर्टच्या मदतीने केलं होतं प्रपोज
राहुलची दिशाला प्रपोज करण्याची स्टाईल जरा हटके होती. त्याने घातलेल्या पांढऱ्या रंगाच्या टीशर्टवर फ्रंट साईडला मॅरी मी? आणि टीशर्टच्या मागच्या बाजूला दिशा वाढदिवसाच्या शुभेच्छा असा प्रिंट असलेला टीशर्ट त्याने घातला होता. दिशा परमारनेही त्यांचा प्रस्ताव मान्य केला. या टी-शर्टसंदर्भात पुढे काय योजना आहे हे राहुल वैद्यने सांगितलं आहे. राहुलने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर टी-शर्टचे फोटो पोस्ट केले आहेत.
फोटोंमध्ये दिशा परमार हातात टी-शर्ट घेतलेला दिसत आहे. या टी-शर्टचे फोटो शेअर करताना राहुलने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'एक टी-शर्ट जो मी कधीही विसरू शकत नाही. या टीशर्टच्या मदतीने मी तिला प्रपोज केलं. आता मी या टीशर्टची फ्रेम तयार करीन. त्याचबरोबर राहुल वैद्यने कॅप्शनमध्ये हार्ट इमोजी देखील पोस्ट केले आहेत. ही पोस्ट त्याने दिशाला देखील टॅग केलं आहे.
खतरों के खिलाडीमध्ये दिसणार
राहुल वैद्य आणि दिशा परमार हे बर्याच दिवसांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर राहुल आणि दिशाचे अनेक फोटो व्हायरल झाले. राहुल वैद्य काही काळ केपटाऊनमध्ये होता. तो खतरों के खिलाडी सीझन 11चं शूटिंग करत होता पण आता तो मुंबईला परतला आहे.