हिना खानने दक्षिणेतील अभिनेत्रींची केली थट्टा, या अभिनेत्रीने सुनावलं

आजचा दिवस 'बिग बॉस 11'मधील स्पर्धक हिना खान हिच्या चर्चेचा आहे. बिग बॉसमध्ये दक्षिणेतील अभिनेत्री हंसिका मोटवानीवर हिना खानने टीका केली होती. हंसिकाने यावर ट्विट करत तिला चांगलंच सुनावलं. हंसिकासह अभिनेत्री श्रीदेवी श्रीधर हिनेही ट्विटवर आपली नाराजी व्यक्त केली.

Updated: Oct 28, 2017, 02:06 PM IST
हिना खानने दक्षिणेतील अभिनेत्रींची केली थट्टा, या अभिनेत्रीने सुनावलं title=

मुंबई : आजचा दिवस 'बिग बॉस 11'मधील स्पर्धक हिना खान हिच्या चर्चेचा आहे. बिग बॉसमध्ये दक्षिणेतील अभिनेत्री हंसिका मोटवानीवर हिना खानने टीका केली होती. हंसिकाने यावर ट्विट करत तिला चांगलंच सुनावलं. हंसिकासह अभिनेत्री श्रीदेवी श्रीधर हिनेही ट्विटवर आपली नाराजी व्यक्त केली.

हिना ही बिग बॉसमध्ये दक्षिणेतील चित्रपटाबाबत चर्चा करत होती. दरम्यान, ती म्हणते की, तिला दक्षिणेतील चित्रपटांसाठी अनेक ऑफर आलेत. पण वजन वाढण्यासाठी सांगितल्याने तिने ते नाकारले.

हिना खानच्या या टीकेवरच अभिनेत्री हंसिका मोटवानी आणि श्रीदेवी श्रीधर यांनी आक्षेप घेतला आणि ट्वीट करत नाराजी व्यक्त केली. हंसिका मोटवानीने बॉलिवूड कलाकारासोंबत देखील काम केले आहे. सोशल मीडियावर हंसिकाने ट्विट करत म्हटलं की, बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्रींनी दक्षिणेतील सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे आणि अजूनही करत आहेत.

श्रीदेवी श्रीधरने हिनाचा तो व्हिडिओ ट्विटर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अलीकडे हिनाने ढिंचक पुजाची देखील थट्टा केली होती.