हिमेश रेशमियाने शेअर केले हनिमून फोटोज...

बॉलिवूड गायक हिमेश रेशमिया अलिकडेच गर्लफ्रेंड सोनिया कपूरसोबत विवाहबद्ध झाला. 

Updated: May 17, 2018, 12:43 PM IST
हिमेश रेशमियाने शेअर केले हनिमून फोटोज... title=

मुंबई : बॉलिवूड गायक हिमेश रेशमिया अलिकडेच गर्लफ्रेंड सोनिया कपूरसोबत विवाहबद्ध झाला. अनेक वर्षांपासून सोनियासोबत रिलेशनशीपमध्ये असलेल्या हिमेशने अखेर विवाहगाठ बांधली. आता सध्या दोघेही हनीमूनसाठी रवाना झाले आहेत. हनीमूनचे काही फोटोज आणि व्हिडिओज हिमेशने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात दोघांची क्यूट केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. 

 

Child within us.

A post shared by Himesh Reshammiya (@realhimesh) on

तरीही फिटनेसकडे विशेष लक्ष

हनीमूनसाठी गेला असला तरी हिमेश फिटनेसकडे पूर्ण लक्ष देत आहे. हिमेश-सोनिया हनीमूनसाठी दुबईला गेल्याची खबर आहे. मात्र अजूनही काही नक्की ठाऊक नाही. हिमेश-सोनिया दोघांनी दिल्लीतील गुरुद्वारात विवाह केला. विवाहसोहळ्यास जवळचे नातेवाईक आणि खास मित्रमंडळी उपस्थित होते.

 

Work out mode in holiday mood! Cheers & have a great day to all! Love you

A post shared by Himesh Reshammiya (@realhimesh) on

१० वर्षांपासून सुरू होते डेटिंग

सोनिया-हिमेश एकमेकांना १० वर्षांपासून डेट करत आहेत. सोनिया कपूर अभिनेत्री असून तिने किटी पार्टी, पिया का घर, जय हनुमान, कुसुम यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

 

Love is a net that catches hearts like a fish.

A post shared by Himesh Reshammiya (@realhimesh) on