'हायजॅक' सिनेमाचा धम्माल ट्रेलर प्रेक्षकांंच्या भेटीला

कास्टिंग काऊच ... हा भारतीय डिजिटल पार्टीचा धम्माल वेब शो इंटरनेटवर तुफान गाजला. सध्या या वेब शोचा तिसरा आणि अंतिम सीझन सुरू आहे. मुलाखत  या प्रकाराला कॉमेडी ट्विटने आणि हटके अंदाजात प्रेक्षकांसमोर आणण्यामध्ये भाडिपाची टीम यशस्वी ठरली आहे. इंटरनेटवर मराठी भाषेत दर्जेदार कंटेन्ट उपलब्ध करून देण्यामध्ये भाडिपाचा खूप मोठा वाटा आहे. पण या वेब चॅनेलमधून निपुण धर्माधिकारी, अमेय वाघ आणि सारंग साठे हे तीन चेहरे घराघरात पोहचले.   

Updated: Mar 30, 2018, 07:01 PM IST
'हायजॅक' सिनेमाचा धम्माल ट्रेलर प्रेक्षकांंच्या भेटीला  title=

 मुंबई : कास्टिंग काऊच ... हा भारतीय डिजिटल पार्टीचा धम्माल वेब शो इंटरनेटवर तुफान गाजला. सध्या या वेब शोचा तिसरा आणि अंतिम सीझन सुरू आहे. मुलाखत  या प्रकाराला कॉमेडी ट्विटने आणि हटके अंदाजात प्रेक्षकांसमोर आणण्यामध्ये भाडिपाची टीम यशस्वी ठरली आहे. इंटरनेटवर मराठी भाषेत दर्जेदार कंटेन्ट उपलब्ध करून देण्यामध्ये भाडिपाचा खूप मोठा वाटा आहे. पण या वेब चॅनेलमधून निपुण धर्माधिकारी, अमेय वाघ आणि सारंग साठे हे तीन चेहरे घराघरात पोहचले.   

 सारंग- अमेय- निपुण हिंदीमध्ये एकत्र   

 कास्टिंग काऊचवर मराठीप्रमाणेच अनेक हिंदी कलाकारांनीही हजेरी लावली होती. मात्र आता अमेय- निपुण आणि सारंग हे त्रिकुट हिंदी सिनेमातून त्यांच्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. आकर्ष खुराना दिग्दर्शित 'हाय जॅक' या विनोदी चित्रपटात हे तिघेही झळकणार आहेत. 'हायजॅक'चा ट्रेलर नुकताच रसिकांच्या भेटीला आला आहे.  

 

 

20 एप्रिलला येणार सिनेमा   

 चार- पाच जण मिळून पहिल्यांदा विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न करतात. मात्र इतक्या टेन्स स्थितीमध्येही कसा गोंधळ उडतो ? विमानात आणि विमानाबाहेर काय काय गंमतीजंमती घडतात? हे पाहणं मजेशीर आहे. २० एप्रिल रोजी हा कॉमेडी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 सारंग साठेचा लूक बदलला  

 सारंग साठे ऐरवी बिअर्ड लूकमध्ये दिसतो. मात्र 'हायजॅक' सिनेमासाठी सारंगने शेव्ह केलं होतं. त्याचा क्लिन शेव्ह लूक पाहून त्याच्या घरातील मंडळींनीही त्याला ओळखले नव्हते.