VIDEO: 'सुपर ३०' सिनेमा बनवण्यासाठी लेखकाने लढवली 'अशी' शक्कल

'काबिल' सिनेमातून दृष्टीहीनाची भूमिका करणारा अभिनेता ह्रतिक रोशन लवकरच आपल्या 'सुपर ३०' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ऋतिक रोशन हा आनंद कुमार यांच्या भूमिकेत असणार आहे. पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. आनंद कुमार यांच्या आयुष्याची स्टोरी सिनेमाच्या रुपात येण्यासाठी तब्बल ८ वर्षांचा कालावधी लागला.

Updated: Mar 30, 2018, 06:12 PM IST
VIDEO: 'सुपर ३०' सिनेमा बनवण्यासाठी लेखकाने लढवली 'अशी' शक्कल title=

नवी दिल्ली : 'काबिल' सिनेमातून दृष्टीहीनाची भूमिका करणारा अभिनेता ह्रतिक रोशन लवकरच आपल्या 'सुपर ३०' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ऋतिक रोशन हा आनंद कुमार यांच्या भूमिकेत असणार आहे. पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. आनंद कुमार यांच्या आयुष्याची स्टोरी सिनेमाच्या रुपात येण्यासाठी तब्बल ८ वर्षांचा कालावधी लागला.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा असणार आहे. गरिब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणाऱ्या आनंद कुमार यांच्या जीवनावर हा सिनेमा आहे.

या सिनेमाची शूटिंग जानेवारी महिन्यात सुरु झाली असून पुढील वर्षी जानेवारी महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. याच दरम्यान आनंद कुमार यांनी झी न्यूजच्या ऑनलाईन टीमसोबत टाऊनहॉल केलं. यावेळी आनंद कुमार यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. 

गुगल केल्यावर कळलं कोण आहे अनुराग बासू?

आनंद कुमार यांनी सांगितलं "८ वर्षांपूर्वी मला फोन आला. फोन करणाऱ्याने सांगितलं की, तुमच्यावर सिनेमा बनवायचा आहे. मला वाटलं कुणीतरी मस्करी करत आहे. मी नाव विचारलं तर त्याने सांगितलं संजीव दत्ता. मी हे नाव कधीच ऐकलं नाही. त्यांनी सांगितलं की, आपल्यासोबत अनुराग बासू सुद्धा असणार आहेत. मी सिनेमा पाहत नसल्याने अनुराग बासू कोण आहेत हे मला माहितीच नव्हतं. त्यानंतर मी गुगलवर सर्च केल्यावर मला आनुराग यांच्याबद्दल कळालं." मात्र, आनंद कुमार यांनी सिनेमा बनवण्यात जास्त रुची दाखवली नाही.

पत्रकार बनून केला संपर्क...

यानंतर लेखक संजीव दत्ता यांनी एक पत्रकार असल्याचं सांगत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. आनंद कुमार यांनी सांगितलं की, "संजीव दत्ता यांनी पत्रकार बनून माझ्यासोबत संपर्क केला आणि मुलाखत घेण्यासाठी आल्याच सांगितलं. त्यानंतर संजीव आणि अनुराग बासू माझ्या घरी दाखल झाले. त्यांनी सांगितलं स्टोरी खूपच चांगली आहे आणि त्यावर सिनेमा बनवायचा आहे.

यानंतर त्यांनी 'बर्फी', 'जग्गा जासूस' सिनेमा बनवले आणि त्याच्याच कामात बीझी झाले. मात्र, लेखक संजीव दत्ता हे यावरच काम करत होते. जवळपास दिड वर्ष अनेक मोठ-मोठ्या लोकांनी माझ्यासोबत संपर्क केला. त्यावेळी मला वाटलं की, सिनेमा खूपच चांगला आहे आणि मग मी सिनेमाची स्टोरी ऐकली.

पापड विकून केला अभ्यास...

आनंद कुमार यांनी सांगितले की, वडिलांच्या निधनानंतर अनुकंप तत्वावर मला नोकरी मिळत होती मात्र, आईने शिक्षण पूर्ण करण्यास सांगितलं. पैशांसाठी आईने पापड विकण्यास सुरुवात केली आणि त्यावर घर चालत होतं.