गरोदर असताना आलियानं Shoot केलेला हॉलिवूडपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Heart of Stone Movie Trailer: आलिया भट्टचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'हार्ट ऑफ स्टोन'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातून आलिया नकारात्मक भुमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. सध्या तिच्या या ट्रेलरची चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 18, 2023, 04:53 PM IST
गरोदर असताना आलियानं Shoot केलेला हॉलिवूडपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला title=
June 18, 2023 | heart of stone trailer out alia bhatt going to play negetive role in the film

Heart of Stone Movie Trailer: आलिया भट्टच्या हार्ट ऑफ स्टोन या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. भरपूर सस्पेन्स, थ्रिलर आणि एक्शनसह हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या ट्रेलरची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. आलिया भट्ट या चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे याची चर्चा रंगत असताना आलियानं या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित केला होता. त्यानंतर तिच्या या चित्रपटाची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागून राहिली होती. आलिया या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. आपल्या शुटिंगच्या वेळी ती गरोदरही होती. त्यामुळे राहा पोटात असताना तीआपली ही पहिली हॉलिवूड फिल्म् संपुर्ण केली आहे. आता अखेर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती की आलियाची कोणती भुमिका आपल्यालाही या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. ती या चित्रपटाची नायिका असणार आहे की या चित्रपटात तिची दुसरी कुठली व्यक्तिरेखा असणार आहे. याबद्दल बॉलिवूडमध्ये चांगली चर्चा होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर आला आहे. आलिया या चित्रपटात खलनायिकेची भुमिकेतून दिसते आहे. तिचा लुक फारच वेगळा वाटतो आहे. या टीझरमध्ये आलियाची झलक तिनवेळा दिसते तिच्या तोंडून आकर्षक डायलॉग्सही बाहेर येतात. तिचा हा हॉलिवूडपट 11 ऑगस्टला या वर्षी प्रदर्शित होणार आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाच्या ट्रेलराला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 

मागील वर्षी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचे लग्न झाले. एप्रिल 2022 मध्ये त्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला होता. त्यानंतर मागच्याच वर्षी आलियानं आपली लेक राहाला जन्म दिला. आता राहा ही सात महिन्यांची झाली आहे. आलिया लग्नाआधी गरोदर होती का याबद्दल सोशल मीडियामध्ये नानातऱ्हेची चर्चा ही सुरू झाली होती. रणबीरचा Animal तर आलियाचा या Heart of Stone चित्रपटासह Rocky Aur Rani Ki Prem Kahani हा चित्रपटही प्रदर्शित होतो आहे. त्यामुळे सध्या या दोघांची चांगलीच चर्चा रंगली आहे. या वर्षी रणबीर कपूरचा Tu Zoothi Mein Makkar हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटालाही प्रेक्षकांनी तूफान प्रतिसाद दिला आहे. 

हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून आता आलियाच्या चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे. याच चित्रपटात जेमी डोरनन, मॅथियास श्वेघोफर, जिंग लुसी, पॉल रेडी, सोफी ओकोनेडो, गॅल गडोट आणि आलिया भट्ट दिसणार आहेत.