'तो सतत मला स्पासाठी बोलवत होता...' कास्टिंग काऊचवर शिव ठाकरेचा मोठा खुलासा

शिवने भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्याने कास्टिंग काऊचबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे 

Updated: Mar 24, 2024, 07:46 PM IST
'तो सतत मला स्पासाठी बोलवत होता...' कास्टिंग काऊचवर शिव ठाकरेचा मोठा खुलासा title=

मुंबई : "बिग बॉस मराठी' फेम अभिनेता शिव ठाकरे नेहमीच त्याच्या साधेपणाने प्रेक्षकांची मने जिंकतो. डाऊन टू अर्थ असा हा अभिनेता आहे. सोशल मीडियावर शिवचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी शिव सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. शिव कायमच त्याच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असतो. तसंच अभिनेत्याला त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील ओळखलं जातं. नुकतीच शिवने भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्याने कास्टिंग काऊचबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे ज्यामुळे पुन्हा एकदा अभिनेता चर्चेत आला आहे. 

कास्टिंग काऊचच्या प्रकारातून थोडक्यात बचावलो असं म्हणाताना शिव मुलाखतीत म्हणाला, "बिग बॉस मराठी' हा माझा पहिला शो होता ज्यासाठी मला खूप मोठी रक्कम मिळाली होती. मला २५ लाख रुपये प्राइज मनी मिळाली होती. त्यातून ८ लाख रुपये रक्कम सेकंड रनरअपला द्यावी लागली. त्यावेळी मेकर्सने माझ्या आईवडिलांसाठी फ्लाइटचं तिकीट सुद्धा काढून दिलं नव्हतं. माझ्या पैशातच मला ते काढावं लागलं होतं. प्राइज मनी मिळाल्यानंतर टॅक्स वगैरे कट करुन माझ्या हातात फक्त ११ लाख रुपये आले होते. त्यातूनच मी माझ्या डिझायनर आणि मॅनेजरला त्यांचे पैसे दिले होते.'' 

शिव पुढे म्हणाला, त्यानंतर मला बिग बॉस १६ साठी कॉल आला. त्यावेळी मला ते इतकी फी देतील यावर माझा विश्वासच बसत नव्हता", बिग बॉस हिंदी केल्यानंतर एका वर्षभराच्या आतच माझ्या आयुष्यात अनेक बदल घडले.  बिग बॉसमधून मला पैसे तर मिळालेच पण खतरों के खिलाडी, झलक दिखला जा सारखे शो सुद्धा मिळाले. रिल्स पोस्ट करण्यापासून ते गेस्ट अपिरियन्ससाठी सुद्धा पैसे मिळू लागले. माझा मॅनेजर मला कायम म्हणायचा की हे पैसे फारच कमी आहेत. पण, मला ते मिळणारे पैसेही खूप वाटायचे." असं शिव म्हणाला.

शिव पुढे म्हणाला,  'बिग बॉस मराठी'नंतर मला एका इव्हेंटला जायचं होतं. ज्याच्यासाठी मी कपडे घेण्यासाठी एका स्टुडिओमध्ये गेलो होतो कपड्यांचं माप देण्यासाठी. पण,तिथल्या एका टीम मेंबरला मी आवडलो आणि तो माझ्या मागेच लागला. कपडे दाखवण्याऐवजी तो सतत मला स्पासाठी बोलवत होता. शेवटी वैतागून मी तिथून निघून आलो. पण, तो सतत मला मेसेज करुन मी स्पासाठी कधी येणार विचार होता." असं अभिनेत्याने खुलासा केला. शिवच्या खुलाश्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.