हस्तर पुन्हा येतोय! सोहम शाहने दिले Tumbbad 2 चे संकेत, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Tumbbad 2 :  'तुंबाड' मधील हस्तरची पुन्हा एन्ट्री...  सोहम शाहनं केलेल्या पोस्टमुळे एकच चर्चा

दिक्षा पाटील | Updated: Aug 29, 2024, 12:25 PM IST
हस्तर पुन्हा येतोय! सोहम शाहने दिले Tumbbad 2 चे संकेत, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत title=
(Photo Credit : Social Media)

Tumbbad 2 : 2018 मध्ये माणसाला असलेल्या लालसेवर 'तुंबाड' हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात दाखवण्यात आलेल्या सगळ्या गोष्टींनी सगळ्यांना खूप आश्चर्य झालं होतं. तर यात दाखवण्यात आलेला राक्षस हस्तर ज्याला चपाती-भाकरीची भूक असते आणि त्याच्या या भूकेचा वापर करत विनायक राव त्याच्याकडून सोन्याची नाणी काढून घ्यायचे. 'तुंबाड' मधील राक्षस प्रेक्षकांमध्ये चांगलाच लोकप्रिय ठरला . या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, या सगळ्यात 'तुंबाड'चा विनायक राव म्हणजेच सोहम शाहनं एक भीतिदायक फोटो शेअर केला आहे. त्यावरून आता प्रेक्षकांना असं वाटतं की 'तुंबाड 2' येण्याची हिंट दिली आहे. 

'तुंबाड' चे निर्माता आणि अभिनेता सोहम शाहच्या सोशल मीडिया पोस्टनंतर 'तुंबाड 2' ला घेऊन वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. सोहमनं चित्रपटातील एक रोमांचक असा फोटो शेअर करत कॅप्शन दिलं की 'हस्तरसोबत चील करतोय.' त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये 'तुंबाड 2' ला घेऊन उत्सुकता निर्माण झाली आहे. खरंतर 30 ऑगस्ट रोजी 'तुंबाड' पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सोहमनं जो फोटो शेअर केला आहे. त्यात तो एका ड्रामॅटिक सीनमध्ये दिसत आहे. त्यात राक्षस हस्तर त्याला मागे खेचताना दिसत आहे. फोटोला जे नाटकीय रुपांतर दिलं आहे गुढ असलेलं कॅप्शन दिलं आहे त्यावरून या पोस्टमध्ये काही तरी लपवत असल्याचं चाहते म्हणत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'तुंबाड'मध्ये हॉरर आणि काल्पनिक गोष्टी अशा पद्धतीनं दाखवण्यात आल्यानं हा एक कल्ट चित्रपट ठरला आहे. सोहम शाहचा फोटो पाहून त्याच्या चाहत्यांना आणि इंडस्ट्रीतील इतर लोकांना उत्साह झाला आहे. चित्रपटातील काही भीतीदायक फोटो आणि एक नवी झलक पाहिल्यानंतर आता असं वाटतंय की ते पुन्हा काही नवीन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

हेही वाचा : एव्हरग्रीन नागार्जुनची पहिली पत्नी कोण? संपत्तीपासून कुटुंबापर्यंत, राजेशाही आयुष्य जगतोय साऊथ सुपरस्टार

सोहमच्या पोस्टवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'तुंबाड'चा दुसरा भाग येण्याची शक्यता आहे आणि प्रेक्षकांना पुन्हा एकदा असा भयपट पाहण्याची संधी मिळणार?' दुसरा नेटकरी म्हणाला, 'कृपया चुकूनही हा चित्रपट रिरिलीज करू नका. आम्ही हा चित्रपट त्यावेळी थिएटरमध्ये जाऊन पाहिला आहे.' हा चित्रपट आताच्या ओटीटीवर अवलंबून असणाऱ्या मुलांना दाखवू नका. त्यांना ही मज्जा कळणार नाही.